उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन; नागरिकांमधून मधून समाधान व्यक्त
*💫सावंतवाडी दि.०९-:* पाळणेकोडं धरण आणि चिवार टेकडी येथे काल स्ट्रीट लाईटचे उद्घाटन सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थित उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर हस्ते करण्यात आले आहे. गेले अनेक वर्ष हा भाग अंधारमय होता. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी या भागात अंदाजे १० स्ट्रीट लाईट बसवले आहेत. त्यामुळे तो भाग आता प्रकाशमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब नगरसेवक नासिर शेख, दिलीप भालेकर, अमित परब, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.