विभागाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त:बळी गेल्यावरच जाग येणार का..?” ग्रामस्थांचा सवाल..
सावंतवाडी : मळेवाड ते आजगाव सावरदेव व मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे मागील काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण खराब होऊन रस्त्यावर खड्डे पडले. मात्र हे खड्डे अजूनही बुजवले नाहीत. त्यामुळे येथे वाहने घसरून अपघात घडत आहेत. वारंवार अपघात घडूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून याचा त्रास मात्र वाहन धारकांना होत आहे. मळेवाड जंक्शन येथे आज सायंकाळीं असाच दुचाकीस्वार छोट्या मुलीसह जात असताना गाडी खड्ड्यातील पसरलेल्या खडीवर घसरून पडल्याने अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र वारंवार असे अपघात घडत असून सुद्धा रस्त्यावरील खड्यांबाबत, पसरलेल्या खडी बाबत संबंधित विभाग,ठेकदार लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येथे एखादा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येणार का, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
