चौकुळचा तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता…

⚡आंबोली,ता.९-: चौकुळ बोरी धनगरवाडी येथील दत्तू वरक वय २३, हा युवक आठ दिवसापासून पंढरपूर येथून बेपत्ता आहे. 2 डिसेम्बर ला गावी चौकुळ येथे जातो असे सांगून आला तो पोहचलाच नाही.तो पंढरपूर लिंकरोड येथे एका रेस्टॉरंट मध्ये कामाला होता.आठ दिवसापासून तो बेपत्ता आहे.उंची पाच फुट सहा इंच,रंग काळा सावळा,अंगात लाल रंगाचे टी शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केलेली आहे.सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास आंबोली पोलिस किंवा नाते वाईकांशी संपर्क साधने असे आवाहन केले आहे.बेपत्ता असल्याची खबर पोलिसात त्याच्या भावाने दिली आहे.

You cannot copy content of this page