रुग्णांना पोष्टिक आहार मिळण्यासाठी आजपासून अंडी वाटप; सर्व स्तरातून धुरी यांचे कौतुक*
*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात कोरोना मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे.परंतु कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे.यासाठीच तालुक्याच्या कोव्हिडं सेंटर मधील रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख व प स सदस्य बाबुराव धुरी यांनी रुग्णांना आज पासून अंडी वाटप सुरू केले,ज्येष्ठ शिक्षक केंद्रप्रमुख गुरुदास कुबल हेही यावेळी उपस्थित होते आज पासून अंडी वाटपाचा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा धुरी यांनी स्पष्ट केले आहे,धुरी यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून रुग्णांनीही बाबुराव धुरी यांचे आभार मानले आहेत.