आपल्या अनुभवाचा ऊपयोग कोकणच्या पर्यटनासाठी करून घ्यावा…

निला लाड यांचे आवाहन

*💫मालवण दि.०९-:* कोरोना सारख्या भीषण महामारीने देशभरातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला असून यातून सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.विशेषतः पर्यटन उद्योगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून नोव्हेंबर २०२०ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांच्या कालावधी या क्षेत्रातील छोटे मोठे व्यवसायिक थोडी फार उभारी घेत असताना मार्चपासून कोरोना महामारीने देशभर हैदोस घातल्याने सगळ्यांचे कंबरडे मोडले आहे..आणि म्हणूनच समाजातील प्रत्येक घटकांनी आता एकमेकांना सावरण्यासाठी पुढे आलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक अडचणीत असून भविष्यात त्यांना शासन स्तरावर पर्यटन व्यवसायला पुरक अशा निर्णयासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्ट सौ.निला लाड यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाची पर्यटनाबाबत पुढील दिशा व नियोजन करण्यासाठी आभासी बैठक आयोजित केलेली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सौ.निला लाड यांनी कोरोना मुळे या व्यवसायिंकापुढे मोठे आव्हान निर्माण झालेले असून भविष्यात आपण सर्वांनी एकत्रित काम करून यावर मात करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत पर्यटन महासंघाचे अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी या महासंघाच्या स्थापनेबाबतचा हेतू स्पष्ट केला.यावेळी झालेल्या चर्चेत कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर, सचीव अँड.नकुल पार्सेकर, उपाध्यक्ष श्री. डि.के.सावंत,सोशल मिडिया प्रमुख श्री किशोर दाभोलकर, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री जितेंद्र पंडीत, मालवणचे अध्यक्ष श्री. अविनाश सामंत आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page