आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मतदारसंघासाठी सर्वात जास्त नुकसानभरपाई मंजूर..
⚡ओरोस ता १०-: ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे.
यावर्षीच्या मान्सून कालावधीत सातत्याने पाऊस पडत होता. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस पडल्याने शेती कामे थांबली होती. परिणामी शेतीची मोठी नुकसानी झाली होती. ऑक्टोबर महिन्यात तर अतिवृष्टी झाली. यामुळे पिकलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. उभ्या पिकांना पुन्हा कोंब आले होते. यामुळे शासनाने पंचनामे केले होते. त्याची नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. शासनाने चार कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कुडाळ तालुक्यातील 8891 शेतकरी तर मालवण तालुक्यात 3122 अश्या कुडाळ मतदारसंघात एकूण 12013 शेतकऱ्यांना मिळून एकूण 2 कोटी 79 लक्ष 60 हजार 755 रुपये एवढी नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण नुकसानभरपाईच्या 50 टक्के पेक्षा जास्त नुकसानभरपाई कुडाळ मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाली असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.
