धावत्या कारला लागली आग

कळसुली हर्डी फाटा येथे घडली घटना

*💫कणकवली दि.०९-:* धावत्या कारला आग लागून नुकसान झाल्याची घटना कळसुली हर्डी फाटा येथे घडली.डोंबिवली मुंबई येथे कामानिमित्त राहणारे आणि सध्या लॉकडाऊन मध्ये कळसुली येथील आपल्या गावी आलेले महेश मारुती पवार हे आपल्या ताब्यातील ह्युंडाई कंपनीची वेर्णा कार ( MH- 02 – CH – 7729 ) घेऊन 8 मे रोजी रात्री कळसुलीहून कणकवली च्या दिशेने येत होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हर्डी फाट्यावर त्यांच्या धावत्या कारचा इंजिनमधून धूर येत असल्याचे बाजूने जाणाऱ्या वाहनचालकाने सांगितले. पवार यांनी लागलीच कार थांबवून आग विझवली. या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले असून तशी खबर महेश पवार यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.

You cannot copy content of this page