⚡सावंतवाडी ता.१०-:
शहरातील उभा बाजार परिसरातील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या दत्तराम शिरोडकर (वय ६३) यांचे बुधवारी कोल्हापूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले. सुवर्ण ज्वेलर्सचे संजू शिरोडकर यांचे ते ज्येष्ठ भाऊ होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व तीन बहिणी असा परिवार आहे. शिरोडकर यांच्या अकाली निधनाने सावंतवाडी शहरातील सुवर्णकार समाजात तसेच उभा बाजार परिसरात शोककळा पसरली आहे.
निधनाच्या दुखःद प्रसंगानंतर उभा बाजारातील सुवर्ण व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत श्रद्धांजली अर्पण केली.आज सायंकाळी उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडणार आहेत.शिरोडकर यांच्या निधनाने सुवर्ण व्यवसायिक, मित्रपरिवार व नातेवाईकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
