सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५३ रूग्ण सापडले

शहरात १ तर ग्रामीणात ५२ *सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५३ रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५२ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात आज सालईवाडा भागात १ रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात पाडलोस १, चौकुळ १, माडखोल ४, मडूरा १, सातोसे…

Read More

*तेरेखोल नदीपात्रात मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटली*

*💫सावंतवाडी दि.१९-:* तेरेखोल नदीपात्रात किनळे ख्रिश्चन वाडी येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचे ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह एका महिलेचा असून, विमल जनार्दन पटेकर ( वय ५२) असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला पेडणे गोवा येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी केला आहे.

Read More

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते तथा आपत्ती व्यवस्थापन व मदत , पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे येणार असून, शुक्रवार दिनांक २१ मे रोजी संध्याकाळी त्यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. तर २२ मे रोजी ते जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी सबंधित अधिकाऱ्यां सोबत करणार…

Read More

बाधितांना सर्वतोपरी सहाय्य करणार

पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. या दुर्दैवी घटनेचा ज्यांना ज्यांना फटका बसला आहे अशा सर्व बाधितांना राज्य सरकार व पालकमंत्री म्हणून आपण स्वतः सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या हानीची पहाणी व…

Read More

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केली देवगड बंदरातील नुकसानीची पाहणी…

*💫देवगड दि.१९-:* चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीची आज सिंधदुर्ग जिल्हा कॉँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी प्रत्यक्ष देवगड बंदरावर जाऊन जागोजागी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मच्छीमारांशी संवाद साधला त्यानंतर देवगड मच्छीमार सोसायटी च्या पदाधिकाऱ्यां बरोबर झालेल्या नुकसानी संदर्भात त्यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा करत त्यांच्या भावना समजून घेतल्या व सर्व मच्छिमार बांधवांना शासन स्तरावरून जास्तीत…

Read More

कुडाळ तालुक्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक राणेंचे तहसीलदारांना निवेदन *💫कुडाळ दि.१९-:* कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असतानाच नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला असून त्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुसती पाहणी करून लोकांना भावनिक करण्यापेक्षा स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी. कुडाळ तालुक्यात अनेक…

Read More

मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी सिंधूदुर्ग दौऱ्यावर..

आ वैभव नाईकांशी साधला संपर्क;तौक्ति वादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी *💫कुडाळ दि.१९-:* तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवार २१ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नागरिकांची झालेली नुकसान भरपाई…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २२२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १५ हजार २३८ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ९१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २२२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

*सावंतवाडी तालुक्यातील सर्व पंचनामे येत्या चार दिवसात पूर्ण होतील…

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सावंतवाडी दि.१९-:* तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे सुरू असून, राहिलेल्या भागातील पंचनामे येत्या चार दिवसात पूर्ण होतील. अशी माहिती तालुक्याचे आमदार दिपक केसरकर यांनी झूम ऍप द्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या वादळात तालुक्यातील ४१४ घरांचे नुकसान झाले तर ४ घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. अशी प्राथमिक…

Read More

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी घेतला आढावा…

प्रशासनाच्या मदती पुर्वी शिवसेना पक्षामार्फत आर्थिक दुर्बल घटकांना तातडीने मदत करणार – पालकमंत्री उदय सामंत *💫वैभववाडी दि.१९-:* वैभववाडी तालुक्यातील ‘तौक्ती’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात भेट दिली व त्यानंतर ग्रामपंचायत नाधवडे येथे तालुक्यातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या वादळामध्ये…

Read More
You cannot copy content of this page