मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते तथा आपत्ती व्यवस्थापन व मदत , पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे येणार असून, शुक्रवार दिनांक २१ मे रोजी संध्याकाळी त्यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. तर २२ मे रोजी ते जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी सबंधित अधिकाऱ्यां सोबत करणार आहेत. यावेळी शक्य होईल तसे शासनाच्या नियमांचे पालन करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहन कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page