*💫देवगड दि.१९-:* चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीची आज सिंधदुर्ग जिल्हा कॉँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी प्रत्यक्ष देवगड बंदरावर जाऊन जागोजागी झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मच्छीमारांशी संवाद साधला त्यानंतर देवगड मच्छीमार सोसायटी च्या पदाधिकाऱ्यां बरोबर झालेल्या नुकसानी संदर्भात त्यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा करत त्यांच्या भावना समजून घेतल्या व सर्व मच्छिमार बांधवांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार व बंदर अधिकाऱ्यांसोबत चर्चा व आढावा घेऊन सर्व पंचनामे लवकरात सादर करावेत असे सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत तालुकाध्यक्ष उल्हास मंचेकर सिंधुदुर्ग युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबूलकर तालुका सरचिटणीस सल्लाउद्दीन सोलकर प्रदेश महिला प्रतिनिधी सुगंधा साटम सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी सूरज घाडी युवक तालुका अध्यक्ष देवगड सुरेश देवगडकर व खलिद बगदादी जिल्हा काँग्रेस सदस्य व इतर देवगड काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केली देवगड बंदरातील नुकसानीची पाहणी…
