भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक राणेंचे तहसीलदारांना निवेदन
*💫कुडाळ दि.१९-:* कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असतानाच नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका बसला असून त्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुसती पाहणी करून लोकांना भावनिक करण्यापेक्षा स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी. कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडित झाल्यामुळे सामान्य नागरिकांचे गावोगावी पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. कुडाळात अनेक प्रकल्प विद्युत पुरवठा यावर ते अवलंबून असताना बंद असलेल्या वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश जारी करावेत तसेच कुडाळ तालुक्यात तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी असे निवेदन कुडाळ माजी नगराध्यक्ष तथा भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी कुडाळ तहसीलदार यांना दिले.
