सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५३ रूग्ण सापडले

शहरात १ तर ग्रामीणात ५२

*सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५३ रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५२ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात आज सालईवाडा भागात १ रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात पाडलोस १, चौकुळ १, माडखोल ४, मडूरा १, सातोसे ५, नेमळे २, आरोस २, बांदा १४, कास १, सावराजुवे १, आरोंदा ३, आंबोली ३, फणसवडे ३, कोंडूरा १, सातर्ड ३, गुळदूवे १, निरवडे ३, तळवडे १, माजगाव २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५५३ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page