सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम सावंत यांचे निधन…

*💫कणकवली दि.१३-:* भिरवंडे-मुरडवेवाडीतील रहिवाशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शांताराम रावजी सावंत (91) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. भिरवंडे गावाच्या सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक उपक्रमात ते अग्रेसर असत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे ते शालेय समिती सदस्य होते. जुन्या पिढीतील मनमिळावू, मार्गदर्शक व्यक्तिमत्व त्यांच्या जाण्याने काळाच्या पडद्याआड गेले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुली, सुना,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 26 हजार 444 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,हजार 904 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 576 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून २०० फेस शील्ड

नगराध्यक्ष व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केले सुपुर्द *💫मालवण दि.१३-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या १९८६ मधील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कोविड योद्ध्यांसाठी दोनशे फेस शिल्ड नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. मालवण कोविड उपचार केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी शंभर असे दोनशे फेस शिल्ड देण्यात आले. यावेळी नगरसेवक मंदार केणी…

Read More

कणकवली तालुक्यात सर्वाधिक ९५ मि.मी. पाऊस…

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ५९ (३०५.०६) मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. आतापर्यंत एकूण सरासरी ४७२(२४४०.५)मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३२ रूग्ण सापडले

सावंतवाडी दि.१३ -: सावंतवाडी तालुक्यात आज ३२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात २५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात पांझरवाडा २, सबनीसवाडा २, बाहेरचावाडा १, खासकीलवाडा १, माठेवाडा १ तर ग्रामीण भागात नेतर्डे ३, मळगाव ४, कोनापाल १, सातार्डा ३,…

Read More

नांदगांव ओव्हर ब्रिज रस्ता खचला

कणकवली 13 जून (प्रतिनिधी)- मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा ओव्हर ब्रीज वरील रस्ता पहिल्याच पावसात खचला असून सदर ओव्हर ब्रीज हे आधीपासूनच वाहतूकसाठी नांदगाव ग्रामस्थांनी बंद केला होता तो अद्याप ही बंद आहे. तरीही पहिल्याच पावसात ओव्हर ब्रीज वरील रस्ता खचल्याचे निदर्शनास आले असता नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर यांनी तात्काळ संबंधित केसीसी कंपनीला…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०० रुग्णांना काँग्रेस थाळीचे वाटप

तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या सौभाग्यवतिचा पुढाकार *💫सावंतवाडी दि.१३-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कॉंग्रेस कडून तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी कॉंग्रेस थाळी सुरू केली होती. या थाळीला हातभार लावण्यासाठी स्वतः महेंद्र सांगेलकर यांची पत्नी सौ. उल्का सांगेलकर आणि सौ. रिटा डिसोजा यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेवण तयार केले आहे,आणि आज १०० रुग्णांना अन्नदान…

Read More

खासदार विनायक राऊत यांनी केली खचलेल्या नदीकिनाऱ्याची पाहणी

धुपप्रतिबंधक बंधारा तातडीने करण्याचे दिले आश्वासन मालवण दि (प्रतिनिधी): मसुरे कावावाडी येथे साबाजी हडकर यांच्या घरा नजीक गतवर्षी पावसाळ्यात खचलेल्या नदी किनाऱ्याची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी करत खारलँड विभागाला धुपप्रतिबंधक बंधारा उभारण्याचा प्रस्ताव करण्याचे आदेश दिले. तसेच निधीची तरतूद तातडीने करण्यात येईल असे सांगितले. यावेळी त्यांनी मसुरे खोतजूवा बेट धुपप्रतिबंधक बंधारा व खाजणवाडी- चांदेर…

Read More

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयिन वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी मल्लू खोत राज्यात तिसरी

मालवण ज्युनिअर कॉलेजची आहे विद्यार्थिनी *💫मालवण दि.१३-:* ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु.श्रावणी मल्लू खोत हिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

बांदिवडे गावच्या माजी उपसारपंचांचे अल्पशा आजाराने निधन

मालवण (प्रतिनिधी) बांदिवडे गावचे माजी उपसरपंच बलदेव पुरुषोत्तम प्रभू (वय ७७) यांचे अल्प आजाराने उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. गावच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. बांदिवडे देवस्थानचे ते मानकरी होते. गावच्या तंटामुक्त समितीचे ते माजी अध्यक्ष, तर हरिनाम सप्ताह मंडळाचे ते सचिव होते. भाऊ या टोपण नावाने ते ओळखले जात गरिबांचे ते…

Read More
You cannot copy content of this page