टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून २०० फेस शील्ड

नगराध्यक्ष व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केले सुपुर्द

*💫मालवण दि.१३-:* मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या १९८६ मधील दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी कोविड योद्ध्यांसाठी दोनशे फेस शिल्ड नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. मालवण कोविड उपचार केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी शंभर असे दोनशे फेस शिल्ड देण्यात आले. यावेळी नगरसेवक मंदार केणी यांच्यासह टोपीवाला १९८६ बॅच ग्रुप अॅडमिन स्मृती कांदळगावकर, रिझवान शेख, हरी चव्हाण, सुहास खराडे, रवींद्र शिरपुटे, गुरुनाथ माने, दत्तात्रय तांडेल, राजेश कुशे, लीलाधर सारंग आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page