आशिये महापुरुष मित्रमंडळावतीने आदिवासी बांधवांना वाफयंत्र व मास्क वाटप

*💫कणकवली दि.२०-:* कणकवली तालुक्यातील आशिये महापुरुष मित्रमंडळावतीने ठाकर वाडीतील सर्व आदिवासी बांधवांना मोफत वाफ यंत्र व मास्क वाटप कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भगवान लोके व कणकवली ठाकर समाज अध्यक्ष वैभव ठाकूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून मोफत वाफ यंत्र व मास्क वाटप केले.तसेच कारोना विषयी जनजागृती केली….

Read More

उपरकर मनसेत गेल्यानंतर सेटेलमेंट करणारा पक्ष म्हणून झाली ओळख

आ नाईक याच्यावर ‘उपरा’ म्हणून उपरकर यानी केली होती टिका;सेनेच्या दीपक आंगणेंचे चोख प्रत्युत्तर *💫कुडाळ दि.२०-:* परशुराम उपरकर हे शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना निष्ठावंत म्हणून विधानपरिषदेची आमदारकी बहाल केली. मात्र आमदारकीच्या ६ वर्षात त्यांनी शिवसेनेसाठी काहीच योगदान दिलेले नाही. आमदारकीचे पद उपभोगून झाल्यानंतर मात्र त्यांनी पदांच्या आशेने मनसेत प्रवेश केला. उपरकर यांच्या प्रवेशाअगोदर मनसेत…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.२०-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 74.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 325.7770 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 72.82 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.4260, अरुणा – 27.7998, कोर्ले- सातंडी –…

Read More

सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.२०-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 66 पूर्णांक 4 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 908.13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 95(1031),…

Read More

कोरोना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५८ हजाराची मदत

विकास सावंत यांचा ५८ व्या वाढदिनी उपक्रम;प्रांताधिकारी खांडेकर यांच्याकडे दिला धनादेश *💫सावंतवाडी दि.२०-:* शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय कॉंग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास भाई सावंत यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना या महाभयंकर आजाराशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ५८ हजार रुपयांचा चेक विकासभाई यांच्या हस्ते सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या कडे सुपूर्द केला आहे….

Read More

कोलगाव येथील सुभाष जंगले यांचे पॉकिट हरवले आहे

मिळाल्यास संपर्काचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२०-:* तालुक्यातील कोलगाव येथील सुभाष जंगले या युवकाचे गवळी तिठा ते उपजिल्हा रुग्णालय या प्रवासादरम्यान रोख रक्कम २२ हजार ७०० रुपये तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, ए टी एम कार्ड, असलेले पाकीट हरवले असून, सदर पाकीट कोणाला मिळाले असल्यास ते परत करणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल असे सांगण्यात आले आहे….

Read More

त्या रुग्णवाहीका मालकालाअद्दल घडविल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही:दया मेस्त्री

*💫कणकवली दि.२०-:* त्या मग्रूर रुग्णवाहीका मालकाला पाठीशी घालण्याचा प्रकार चालु असुन त्याला अद्दल घडविल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही.असा इशारा मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना मी निवेदन दिलेले आहेच. मात्र त्यांच्याकडुन देखील कारवाई झाली नाहीच तर राज्य पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे दाद मागुन कारवाई करण्यास भाग पाडू.असेही दया मेस्त्री म्हणाले. कोरोना…

Read More

दळवी महाविद्यालयात 26 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

*💫कणकवली दि.२०-:* मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय आणि स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रक्तपेढी, जि.रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन येत्या 26 जून रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले आहे. संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. दळवी महाविद्यालयात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन…

Read More

सहकार व शिक्षण क्षेत्रातील चळवळ वृद्धिंगत करणारा नेता -विकासभाई सावंत

*💫सावंतवाडी दि.२०-:*विकासभाई सावंत यांचा आज ५८ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाबद्दल ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा घेतलेला हा धावता आढावा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कॅबिनेटमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र असलेल्या विकास सावंत यांना राजकीय वारसा हा त्यांचे वडील भाईसाहेब सावंत यांच्याकडूनच लाभला. २० जून १९६३ रोजी विकास सावंत यांचा जन्म झाला….

Read More

अल्पवयीन युवतीचा विनयभंगप्रकरणी एकास अटक

*💫कणकवली दि.१९-:* अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या आरोपीस शनिवारी अटक करण्यात आली.

Read More
You cannot copy content of this page