*💫कणकवली दि.२०-:* कणकवली तालुक्यातील आशिये महापुरुष मित्रमंडळावतीने ठाकर वाडीतील सर्व आदिवासी बांधवांना मोफत वाफ यंत्र व मास्क वाटप कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भगवान लोके व कणकवली ठाकर समाज अध्यक्ष वैभव ठाकूर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून मोफत वाफ यंत्र व मास्क वाटप केले.तसेच कारोना विषयी जनजागृती केली. आपल्या आदिवासी बांधव कोरोना पासून कसे मुक्त राहतील? या विषयी माहिती देण्यात आले. आशिये ठाकरवाडी कारोना मुक्त रहावी, यासाठी महापुरुष मित्रमंडळ प्रयत्न करत आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष निलेश ठाकूर,उपाध्यक्ष व कणकवली ठाकर समाज अध्यक्ष वैभव ठाकूर,महापुरुष मंडळाचे अध्यक्ष उमेश ठाकर,ग्रामपंचायत पंचायत सदस्य प्रवीण ठाकर,समीरा ठाकर,शर्मिला गवाणकर,सदानंद ठाकर,दत्तप्रसाद गवाणकर,निलेश गवाणकर,सचिन ठाकर,समीर ठाकूर,सूरज गवाणकर,संकेत ठाकर व इतर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.हा कार्यक्रम कारोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आला.तसेच मान्यवरांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
आशिये महापुरुष मित्रमंडळावतीने आदिवासी बांधवांना वाफयंत्र व मास्क वाटप
