इन्सुली येथे १८ लाखाची पकडली दारू

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;गोवा ते राजस्थान अशी कंटेनरमधून होत होती वाहतूक *💫बांदा दि.२८-:* गोव्यातून राजस्थान कडे वाहतूक करण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे कारवाई केली आहे. यामध्ये १८ लाखाच्या दारुसह 6 लाख किमतीचा कंटेनर व 50 हजार रुपयाचे मोबाईल असा एकूण 24 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला…

Read More

जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यातील 12 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले असून कोर्ले सातांडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पही 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 355.0240 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.36 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 23.31 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी…

Read More

खाजगी कोविड हॉस्पिटल च्या दर्शनी भागावर दरपत्रक लावणे बंधनकारक करा

कणकवलीतील डॉ.मिलिंद म्हसकर यांनी वेधले अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांचे लक्ष *💫कणकवली दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी बाबतच्या उपचारासाठी उघडलेल्या व सुरु केलेल्या खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ सामान्य कोविड रुग्णांस मिळण्याच्या कार्यवाहीसाठी कणकवलीतील डॉ. मिलिंद म्हसकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासकीय अधिकारी व पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या निवेदनात त्यांनी कोविड रुग्ण सेवे…

Read More

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 2.375 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1094.135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1186), सावंतवाडी – 02(1349.7), वेंगुर्ला – 00(843.40), कुडाळ – 03(977), मालवण –…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 4 मध्ये समाविष्ट

प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचे आदेश *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 12.7 टक्के असुन सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील स्‍तररचनेनुसार चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्ह्याकरिता दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजलेपासून पासून पुढील आदेशापावेतो खालीलप्रमाणे सुधारीत आदेश लागू केले आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश…

Read More

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही संजु विरनोडकर टिंमची कडवी लढत चालूच…

*सर्व स्तरातून संजू विर्नोडकर आणि टीमचे होत आहे कौतुक *💫सावंतवाडी दि.२८-:* गेले महिनाभर सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीचा काळात देखील चक्रीवादळ, वादळी पावस याची तमा न बाळगता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण व वाढत चाललेले कोवीड रुग्णाचे प्रमाण बघून, रेड झोन क्षेत्रात धाडसाने जाऊन कोरोना प्रतिबंधक फवारणी करताना या टिमने गेल्या महिन्याभरात तळवडे बॅक ऑफ ईडिया व…

Read More

“ज्ञानवर्धिनी”विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविते:डॉ अनिशा दळवी

ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नर्सिंग इन्स्टिट्यूटचा प्रथम वर्षाचा शपथविधी सोहळा *💫कणकवली दि.२८-:* ज्ञानवर्धिनी संस्था विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवतं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन आवश्यक असते. विरळ लोकसंख्या असताना सुध्दा आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाच्या अभावामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. त्यावेळी जीएनएम मिळत नाहीत तर एएनएम तसेच प्रशिक्षित डाँक्टर उपलब्ध करून जिल्हा रेड झोन मधूनबाहेर काढण्यासाठी…

Read More

ओबीसी नोकरी आणि शैक्षणीक आरक्षण केंद्र सरकार अखत्यारित…

मोहिनी मडगावकर यानी अभ्यास करून बोलावे;कॉंग्रेस शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांचा पलटवार *💫सावंतवाडी दि.२७-:* ओबीसी समाजाला देण्यात आलेले नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण हे घटनेत नमूद असून, ते फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे भाजपच्या शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर यांनी ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करूनच स्टेटमेंट द्यावे असा पलटवार कॉंग्रेस शहर अध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर यांनी…

Read More

नाधवडे येथे कृषि अवजारे दुरुस्ती प्रशिक्षण संपन्न

लूपिन फाउंडेशन व प्रवण फार्मर प्रोड्यूसर यांचा संयुक्त उपक्रम वैभववाडी प्रतिनिधी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम लुपिन फाउंडेशन व प्रवण कंपनी करत आहे. शेतीची आवड असलेल्या तरुणांनी या क्षेत्रात स्वतःला झोकून देत प्रगती साधली पाहिजे. अनिश्चित पडणारा पाऊस यामुळे मोठ्याप्रमाणात शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. आधुनिक पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांचा वेळ आणि…

Read More

पत्रकारांना सँनिटायझर, मास्क वाटप

कॉंग्रेसचे अनंत पवार यांचा राहुल गांधी वाढदिनानिमित्त उपक्रम वैभववाडी प्रतिनिधी ‌‌ काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत, सिंधुदुर्ग…

Read More
You cannot copy content of this page