कॉंग्रेसचे अनंत पवार यांचा राहुल गांधी वाढदिनानिमित्त उपक्रम
वैभववाडी प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे,चिटनिस बाळू अंधारी,वैभववाडी युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव,काँग्रेस नेते आनंद पवार, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष पल्लवी तारी, ऍड लता मोंडकर,बाळा पांचाळ,मधुकर पाटेकर,सिध्दार्थ कांबळे,शशिकांत वळंजू,दिलीप रावराणे, सुधाकर लाड,निवासी नायब तहसीलदार ए.के.नाईक,मंडळ अधिकारी पावसकर व पत्रकार उपस्थित होते. फोटो:वैभववाडी युवक काँग्रेस वैभववाडी च्या वतीने पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करतांना तहसीलदार रामदास झळके व अन्य.
