*💫कणकवली दि.२७-:* कणकवली तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता बेळणे खुर्द येथे ही कोरोना काळात कोविड विलगिकरण कक्ष असावे म्हणून सरपंच दिक्षा चाळके यांनी सर्वांच्या सहकार्याने लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. बेळणे खुर्द गावांतील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे या कोविड सेंटरसाठी शालिवाहन प्रभुदेसाई (बेळणे खुर्द),प्रकाश घेवारी ,(कणकवली),राजीव तायशेटे ,(बेलनेखुर्द),निलेश गोवेकर(कणकवली)बाबा काझी (कणकवली) , अण्णा काकडे, (कणकवली) यांनी मदत केली आहे. या सर्वांचे बेळणे सरपंच दिक्षा चाळके यांनी आभार मानले आहेत.यावेळी सरपंच दीक्षा चाळके,ग्रा.सदस्य सुधा चाळके, राजेंद्र चाळके, पोलिस पाटील राजेंद्र चाळके, दिपक चाळके, राजेंद्र चाळके , आरोग्य सेवक परब , सुमंत पावसकर,सत्यवान चाळके, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप चाळके आदी उपस्थित होते.
बेळणे येथे साकारले कोविड सेंटर गावांतील नागरिकांना मिळाला दिलासा
