कणकवलीतील डॉ.मिलिंद म्हसकर यांनी वेधले अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांचे लक्ष
*💫कणकवली दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी बाबतच्या उपचारासाठी उघडलेल्या व सुरु केलेल्या खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ सामान्य कोविड रुग्णांस मिळण्याच्या कार्यवाहीसाठी कणकवलीतील डॉ. मिलिंद म्हसकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासकीय अधिकारी व पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या निवेदनात त्यांनी कोविड रुग्ण सेवे संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधताना म्हटले आहे, की जिल्हाधिकारी व संबंधीत वैद्यकीय तालुका समित्या यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून त्यांना आधिसूचनेचे पालन होण्या बाबत विनंती केलेली आहे . तसेच त्याबाबत प्रत्यक्ष पाठपुरावा देखील मी करीत आहे . तरीही आजतागायत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या ०१ / ०६ / २०२१ रोजीच्या अधिसुचनेची खाजगी रुग्णालयात अंमलबजावणी झालेली नसल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे . महाराष्ट्र शासनाच्यावर संदर्भिय अधिसुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये खालील अधिसुचनेतील नमुद गोष्टींची अंमलबजावणी होण्याबाबत कार्यवाही करण्याची तजवीज करावी१ ) सिंधुदुर्गातील सर्व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये ०१/०६/२०२१ च्या शासकीय नियमावलीतील नमुद दरपत्रक ( डिजिटल ) सर्व कोविड हॉस्पिटलच्या प्रथम दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे . २) या दरपत्रकानुसार कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या सर्व रूग्णांना ०१/०६/२०२१ च्या शासन नियमावलीतील शहरांचे वर्गीकरण सदरातील सिंधुदुर्गातील सर्व तालुक्यांना क दर्जा लागू होत असल्याने क दर्जात केलेले सर्व दर दाखल होणाऱ्या सर्व कोविड रुग्णांना रक्कम रु .२,४०० / – , ४,५०० / – व ५,४०० / – लागू करण्यास बंधन घालणे गरजेचे व आवश्यक आहे . तसेच Remdesevir Injuction ची सरकारमान्य किंमत 1,599 / – एवढीच आकारण्यात आली पाहीजे . यापेक्षा अधीक आकारली जावू नये .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णास होणाऱ्या लागणाऱ्या / घेण्यात येणाऱ्या खर्चाबाबत तपशीलवार माहिती घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यास स्वतंत्र ऑडीटर नेमणे गरजेचे आहे . ४ ) सिंधुदुर्ग जिह्यातील सर्व तालुक्यातील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रूग्णांना ऑडीट झालेले पक्के बिल संबंधित हॉस्पिटलकडून रुग्णास अथवा नातेवाईकांस देणे कोविड हॉस्पिटलला बंधनकारक करणे गरजेचे व आवश्यक आहे . ५ ) सिंधुदुर्गातील सर्व खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध बेड बाबतचा तपशीलदेखील तमाम जनतेस माहित पडेल अशा हॉस्पिटलच्या दर्शनी भागी प्रसिद्ध करणे . हॉस्पीटल ६ ) कोविड सेंटर मध्ये दाखल होणाऱ्या या रूग्णांना देण्यात येणारे खर्चाचे बिल हे शासन नियमावलीतील परिशिष्ठ अ नुसार देणे व रुग्णास त्याची खातरजमा झाली आहे याची खात्री होणे गरजेचे व आवश्यक आहे . शासकीय धोरणानुसार ज्या रुग्णालयांनी शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना घेतलेली आहे त्या सर्व रुग्णालयांनी केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना कोरोना आजाराची उपचार याच योजनेअंतर्गन देणे / मिळणे बंधनकारक आहे व ती अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यातदेखील होणे गरजेचे आहे अशी मागणी डॉ. म्हसकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
