राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;गोवा ते राजस्थान अशी कंटेनरमधून होत होती वाहतूक
*💫बांदा दि.२८-:* गोव्यातून राजस्थान कडे वाहतूक करण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे कारवाई केली आहे. यामध्ये १८ लाखाच्या दारुसह 6 लाख किमतीचा कंटेनर व 50 हजार रुपयाचे मोबाईल असा एकूण 24 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी घेवरचन्द बिष्णोई (वय.30,रा राजस्थान) यास ताब्यात घेतले. या कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या विशेष कृती दल व इन्सुली तपासणी नाका यांनीही कारवाई रात्री तीन वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्या समोर करण्यात आली.
