प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांचे आदेश
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 12.7 टक्के असुन सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील स्तररचनेनुसार चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्ह्याकरिता दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजलेपासून पासून पुढील आदेशापावेतो खालीलप्रमाणे सुधारीत आदेश लागू केले आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिलेत. या आदेशात म्हटले आहे, अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी दुपारी 4.00 वा. पर्यंत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार बंद राहतील. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्रवार (Weekdays) सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार Dining • सायंकाळी 4.00 नंतर पार्सल सेवा चालू राहील व • शनिवार व रविवार (Weekend) फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग सोमवार ते शुक्रवार सकाळी 5.00 वा. ते सकाळी 9.00 वा. पर्यंत सुरु राहतील. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. खाजगी आस्थापना / कार्यालये सुट देणेत आलेली. कार्यालयीन उपस्थिती – शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 25 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. खेळ मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 5.00 वा. ते सकाळी 9.00 वा. पर्यंत परवानगी असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील. चित्रीकरण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5.00 पर्यंत सुरक्षित आवरणामध्ये (Bubble) ज्यात गर्दी होईल असे चित्रिकरण प्रतिबंधीत असेल. आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी चित्रीकरण करता येणार नाही. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम / मेळावे बंद राहतील. लग्नसमारंभ जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा / अंतविधी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत बैठका / निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह. बांधकाम ज्या ठिकाणी कामगारांच्या राहणेची सोय असेल अशी बांधकामे सुरु राहतील. कृषि व कृषि पुरक सेवा सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00 वा. पर्यंत सुरु राहतील. ई कॉमर्स – वस्तू व सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई कॉमर्स सेवा सुरु राहतील. जमावबंदी / संचारबंदी संचारबंदी व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 वा. ते दुपारी 4.00 वा. पर्यंत सुरु राहतील. सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पुर्व नियोजित वेळ ठरवून तसेच एसी सुरु न करणेच्या अटीवर सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील (प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.) माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहतील – परंतू सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामध्ये प्रवाशी थांब्यावर उतरणार असलेस त्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह. 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल) उत्पादक घटक –1 अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) 3.राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. ४. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर/आयटी सर्व्हिसेस गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणार घटक 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल) उत्पादन घटक – इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, न
