इन्सुली घाटीतील धोकादायक झाडे तोडा अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधा
ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांची मागणी *⚡बांदा ता.०७-:* इन्सुली घाटीतील भूस्खलनामुळे धोकादायक बनलेली झाडे लवकरात लवकर तोडण्यात यावीत, अन्यथा मोठ्या दोरखंडाने बांधुन ठेवण्यात यावीत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली घाटीत गेल्या कित्येक वर्षांपासूनची रस्त्यालगत जुनाट झाडे आहेत. दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या झाडांची मुळातील माती वाहून जाऊन भूस्खलनाचे…
