अवैध दारू विक्रीवाल्यांच्या घरात सावंतवाडी पोलिसांची धाड

अवैद्य दारू विक्रीवाल्यांचे दणाणले धाबे;हाती काही न सापडल्याने परतावे लागले माघारी

*⚡सावंतवाडी ता.०६ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी पोलिसांनी आज शहरातली अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरात धाड टाकली, मात्र काही न सापडल्याने त्यांना माघारी परतावे लागले. या धाडीमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सावंतवाडी शहरात सध्या अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ठिकठिकाणी घरात अवैध दारू विक्री होत आहे. यासाठी सावंतवाडी पोलिसांनी ही धाड टाकली. या कारवाईबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दुजोरा दिला आहे.

You cannot copy content of this page