रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनची बाजी

आम.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन;नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पराभव

*⚡कणकवली ता.०६-:* तब्बल 5 वर्षानंतर रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लाइज युनियनने सेनेच्या पाठिंब्याने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पराभव करत तब्बल 924 मतांनी कोकण रेल्वे मान्यताप्राप्त कामगार संघटनेची निवडणूक जिंकली आहे . त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्पलॉइज युनियन संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत कोकण रेल्वे मध्ये अधिकृत कामगार संघटनेचे साठी 5 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज सायंकाळी सात वाजता जाहीर झाला यामध्ये एकूण 5090 कामगारांनी मतदान केले होते त्यामधील 3000 मते ही रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लाइज युनियन ला शिवसेनेच्या पाठिंब्याने मिळाली असून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा तब्बल 5 वर्षनी पराभव झाला आहे .

You cannot copy content of this page