आता गरोदर महिलांना कोरोना लसीकरण

अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती *⚡सिंधुदुर्गनगरी ता ३१-:* १८ वर्षांवरील नागरिकांपाठोपाठ आता गरोदर महिलांनाही आता “कोव्हक्सीन” ही कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक महिन्याचा ९ तरिखला ही लसीकरण मोहीम राबविण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज दिली. कोरोना…

Read More

माध्यमिक शिक्षक भारतीचे नवव्या दिवशी आंदोलन मागे

*⚡सिंधुदुर्गनगरी ता ३१-:* माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड ड्युटी तून मुक्त करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शिक्षक भारतीने २३ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण आजच्या नव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीनुसार व शिक्षण विभागाच्या पत्रानुसार सोडले . शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपल्या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक…

Read More

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून साकारले राधाकृष्ण

*⚡बांदा दि.३१-:* जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी गोपाळकाला सणाच्या निमित्ताने घरातूनच राधाकृष्णच्या वेशभूषा परिधान करून हा दिवस उत्साहाने साजरा केला. भारतीय संस्कृतीत सण उत्सव यांना मानचे स्थान आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. तसेच या सणाच्या…

Read More

ओसरगाव -डगळवाडी येथे कारचा अपघात;

*⚡कणकवली ता.३१-:* मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीनजीक कणकवली ओसरगाव डगळवाडी येथील असरोंडी फाटा नजीक दुपारी 3:30 च्या दरम्यान दोन कारचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारने एकमेकांना धडक दिल्याने एक कार रस्ता सोडून खाली उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अपघातात दोघांना दुखापत झाली असून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे…

Read More

ठाणे उपायुक्तांवरील भ्याड हल्ल्याचा वेंगुर्ला न. प. कर्मचाऱ्यांकडून निषेध

काम बंद आंदोलन : नगराध्यक्षां सह पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन *⚡वेंगुर्ला ता.३१-:* ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर परप्रांतीयाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनने एक दिवस काम बंद आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या बाहेर आंदोलन छेडून निषेध व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह पोलीस निरीक्षक आणि…

Read More

शिवगंगा नदीत वाहून गेलेला भुषण नाईकचा मृतदेह सापडला

मालवण येथील रेस्क्यू टिमला मृतदेह शोधण्यात यश *⚡वैभववाडी ता.३१-:* शिवगंगा नदीत वाहून गेलेला भुषण लाँमवेल नाईक (वय 40 रा. रावेत पिंपरी चिंचवड पुणे) या युवकाचा मृतदेह अखेर सापडला आहे. तिसऱ्या दिवशी मालवण येथील रेस्क्यू टिमला मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. शिवगंगा नदीपात्रात लोरे ते गडमठ दरम्यान आज दुपारी भुषणचा मृतदेह आढळून आला आहे.  तहसीलदार रामदास…

Read More

वैभववाडी ते भुईबावडा मार्गावर पडलेले खड्डे चार दिवसात बुजवा

अन्यथा कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन करणार:शरद कांबळे *⚡वैभववाडी ता.३१-:* वैभववाडी ते भुईबावडा मार्गावर पडलेले खड्डे चार दिवसात बुजविण्यात यावे.अन्यथा कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे नागरीकांना प्रवास करतांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे वारंवार छोटे…

Read More

तरंदळे- माईण एसटी बसफेऱ्या सुरु करा

माईन सरपंच प्रज्ञा मेस्त्री व शिवसेनेचे बाबु घाडी यांनी केली मागणी *⚡कणकवली ता.३१-:* कणकवली तरंदळे माईण एसटी बसफेऱ्या सुरु करण्याची मागणी माईन सरपंच श्रीम.प्रज्ञा मेस्त्री आणि शिवसेनेचे बाबु घाडी यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ – कणकवली यांच्याकडे केली आहे गेले वर्षभर कोरोनाच्या संसर्गामुळे सबंध राज्यभर एस.टी.फेऱ्या बंद आहेत.शिवाय दळण – वळणाच्या कोणत्याही सुविधा…

Read More

सावंतवाडीत प्रथेप्रमाणे मुरलीधर मंदिरात साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा

*⚡सावंतवाडी ता.३१-:* येथील सालईवाडा श्री देव मुरलीधर मंदिर परिसरात दरवर्षी प्रथेप्रमाणे या वर्षी देखील मानाची दहीहंडी अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या वतीने फोडण्यात आली. यावेळी मोजक्याच कान्हांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करत हि हंडी फोडण्यात आली यावेळी अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे अरुण घाडी, मयूर लाखे, महेश पाटील, अविनाश पाटील, युवराज नाईक, राकेश लाखे, धीरज लाखे, उपस्थित होते

Read More

कणकवली शहरात दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा

गोपाळकाल्यानिमित्त बाळ गोपाळानी उत्सवाचा लुटला आनंद *⚡कणकवली ता.३१-:* दीड वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांतच सण व उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. यंदाही दहीहंडी उत्सव कणकवली शहरात साधेपणाने व परंपरा जपत साजरा करण्यात आला. गोकुळ अष्टमी व गोपाळकालानिमित्त शहरात घरोघरी ठिकठिकाणी गोकुळाष्टमीचे मांड मांडण्यात आले होते. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी या मांडाचे पूजाअर्चा करून आरती करण्यात आली,…

Read More
You cannot copy content of this page