उपनगराध्यक्ष पदासाठी ५ रोजी पोटनिवडणूक
*⚡वेंगुर्ला ता.०१-:* सध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी ५ ऑक्टोबरला होणा-या विशेष सभेत पोटनिवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. त्यानुसार ही पोटनिवडणूक होणार आहे. मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या ‘त्या‘ १५ गाळेधारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत तत्कालीन उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी २६ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजिनामा दिला होतो. नगराध्यक्ष दिलीप…
