कवठणी किनळे मुख्य रस्त्यावरील धोकादायक खडकाबाबत वेधले लक्ष
*⚡सावंतवाडी ता.०१-:* शिवसेना ओबीसी सेल सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा शिवसेना आरोंदा विभागीय संघटक संदेश कवठणकर व शिवसैनिकांनी सावंतवाडी तालुक्यातील कवठणी किनळे मुख्य रस्त्यावर धोकादायक स्थितीत असलेल्या भल्या मोठ्या खडकाबाबत बांधकाम विभाग, सावांतवडीला निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी सुधा कवठणकर, रुपेश कवठणकर, समीर सावंत आदी उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले की, कवठणी-किनळे मुख्य रस्त्याच्या संरक्षक भिंतीवर भला मोठा खडक कोसळला असून तो धोकादायक स्थितीत असल्याने तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे या खडकामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धोकादायक खडकाची लवकरात लवकर दखल घेऊन हा खडक दूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आपण याबाबत लवकरात लवकर कारवाही करू असे आश्वासन दिले.
