शहरासह ग्रामीण भागातील गणेशभक्तांत भक्तीपूर्ण वातावरण दिला निरोप
*⚡सावंतवाडी ता.३०-:* सावंतवाडी शहरासह तालुक्यातील आज २१ दिवसाच्या गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे. शहरातील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उभाबाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पासह काही घरगुती गणपती बाप्पाचे देखील भक्तिपूर्ण वातावरणात येथील मोती तलावात विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…”, “गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला…” अशा घोषणांनी सर्व परिसर भक्तीमय झाला होता.
