भाजपाची वैद्यकीय आघाडी गरजुना करणार वैद्यकीय मदत

ग्रामीण भागात नियुक्त करणार आरोग्य सेवक;प्रदेश सहसंयोजक डॉ अमेय देसाई यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने मालवण तालुक्यात आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्फत गरजु रुग्णाना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध वैद्यकीय सुविधांची व मदतीची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मुंबई आणि गोवा येथे जाणाऱ्या गरजु रुग्णांना…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१ हजार २८३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

नांदगाव येथील हायवेची कामे सुरू

मात्र सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न सुटेना *⚡कणकवली ता.०१-:* मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथील ब्रिज वरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे मात्र सर्व्हिस रस्ता प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने सर्व एस टी बसेस किंवा इतर वाहने पुलावरून जात आहे. यामुळे नांदगाव तिठा येथे उतरणा-या प्रवासी वर्गाला नांदगाव हायवे लगत असलेल्या कोळंबा मंदिर समोर उतरावे लागते आहे ….

Read More

दुहेरी हत्याकांड आरोपींना तात्काळ अटक करा

मनसेचे पोलिसांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.०१-:* शहरात काल घडलेला प्रकार दुर्दैवी असून, लवकरात लवकर दुहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी आज मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी यापूर्वी देखील झालेल्या खुनाचा तपास जलद गतीने करून त्याही आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व…

Read More

एसबीसी प्रवर्गातील जातींचे आरक्षण अबाधित ठेवा

एसबीसी संघर्ष समिती अध्यक्ष शशिकांत आमणे यांनी केली मागणी *⚡कणकवली ता.०१-:* एसबीसी प्रवर्गातील जातींचे आरक्षण अबाधित राहण्याची मागणी शासनाकडे वेळोवेळी एसबीसी संघर्ष समितीच्यावतीने एसबीसी संघर्ष समिती अध्यक्ष शशिकांत आमणे यांनी केली आहे. या संदर्भात आता संघर्ष समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान आरक्षण बचाव पाठपुरावा आंदोलन करण्यात येत आहे आज याची सुरुवात कणकवली प्रभारी…

Read More

शहरातील तरुण अवैध धंद्यांकडे जात आहे ओढले

जनतेने एकत्र येत जनजागृती करण्याची गरज ;तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.०१-:* शहरात काल घटलेली घटना ही दुर्देवी असून, या घटनेने संपूर्ण सावंतवाडी शहरासह तालुका हादरून गेला आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना शहरात कधीच घडल्या नव्हत्या. यावेळी शहरातील नागरिकांशी शिवसेनेच्या वरिष्ठांनी संवाद साधला असता, शहरात अवैध धंद्यांना उत आला असून, तरूण या व्यवसायाकडे ओढले…

Read More

कणकवली गणपती साणा येथे ब्रिज कम बंधाऱ्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे वेधले लक्ष *⚡कणकवली ता.०१-:* कणकवली शहरातील जाणवली नदीवरील गणपती साणा येथे ब्रिज कम बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा कणकवलीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.याप्रकरणी तातडीने तपासून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ना.जयंत पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिले…

Read More

वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई यांचा राजन तेली यांच्या हस्ते सत्कार

*⚡कणकवली ता.०१-:* भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी भाजपा जिल्हा कार्यालयात भेट दिली असता भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी डाॅ. अमेय देसाई यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना जिल्ह्यातील आरोग्य सेवेमधील अडचणी सांगीतल्या व भविष्यात वैद्यकीय आघाडी मार्फत सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले ….

Read More

हॉस्पिटल नाका येथे दिपावील शो टाईमचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.०१-:* हॉस्पिटल नाका मित्रमंडळातर्फे दि. ४ ते ६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हॉस्पिटल नाका, बॅ.खर्डेकर कॉलेज नजिक वेंगुर्ला येथे दिपावली शो टाईम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.४ रोजी सायंकाळी ७ वाजता दडिया नृत्य, दि.५ रजी पिपळ पार येथे श्रीसत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता आजगांवकर दशावातर नाट्यमंडळाचा ‘ज्वालाकंठ ज्वालामुखी हा पौराणिक नाट्यप्रयोग, दि.६ रोजी…

Read More

रिक्षा सजावट व फिरते आकाश कंदिल स्पर्धेचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.०१-:* सिहगर्जना संघटना, वेंगुर्ला तर्फे दिवाळी निमित्त ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पावर हाऊस, वेंगुर्ला येथे रिक्षा सजावट व फिरते आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केले आहे. रिक्षा सजावट स्पर्धेसाठी ५० रुपये प्रवेश फी असून प्रथम क्रमांकाला ३ हजार तर द्वितीय क्रमांकाला २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच फिरते आकाशकंदिल स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला १…

Read More
You cannot copy content of this page