संवेदनशील मनातूनच अस्सल कविता लिहिली जाते :कवी प्रा. मोहन कुंभार
सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानच्या काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात रंगले काव्यसम्मेलन कणकवली ता.०४-:* सुखासीन जगणाऱ्या माणसाच्या ओठांवर कधी कविता येत नाही. आलीच तर ती खोटी ठरते. जगण्याने छळले तर कवितेचे शब्द धारदार होतात. दिशा पिंकी शेख यांची कविता आपल्याला अंतर्बाह्य ढवळून काढून विचार करायला लावते. अस्सल जगणं अनुभवणाऱ्या संवेदनशील मनातूनच अस्सल कविता लिहिली जाते, असे प्रतिप्रादन…
