जिल्हा काँग्रेसकडून राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर याचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित सावंतवाडीतील युवा राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याचा नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री.अरविंद मोंडकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हा काँग्रेस आणि सावंतवाडी तालुका काँग्रेस यांच्या माध्यमातून हा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड.दिलीप नार्वेकर, प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सचिव अमिदी मेस्त्री, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, रवींद्र म्हापसेकर, राजू मसुरकर, नागेश मोरये, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष श्री.अरविंद मोंडकर यानी बाळकृष्णला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना बाळकृष्णचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश वाखाणण्याजोगं असल्याचं म्हटलं. जिल्ह्यासाठी हे भूषणावह असून पुढील काळात खेळाच्या माध्यमातून मुलांसाठी काही करण्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी बाळकृष्णचे वडील श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या मुलांसाठी खेळ आणि इतर उपक्रम राबवणा-या मुक्ताई ॲकेडमीचे देखील श्री.अरविंद मोंडकर यांनी कौतुक केले. श्री.कौस्तुभ पेडणेकर यानी बाळकृष्णच्या गेल्या दहा वर्षातील बुदधिबळ खेळातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी विषयी माहीती दिली. उपस्थित सर्वांनी बाळकृष्णचे कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page