Headlines

पालकमंत्री उदय सामंत दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दि. 30 एप्रिल 2022 व दि.1 मे 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.30 एप्रिल 2022 दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग ओरोस-सिंधुदुर्ग येथे शासकीय वैदयकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग पाहणी. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे कोविड आजार व…

Read More

नवोदय विद्यालयाच्या प्रश्नाबाबत शिवसेनेचे उद्या आंदोलन…

सावंतवाडी ता.२९-:* सांगेली येथील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबाबत शिवसेनेने पुकारलेले आंदोलन उद्या होणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे दिली. दरम्यान सावंतवाडी तालुक्यातून ६७ विद्यार्थ्याने बोगस रित्या प्रवेश मिळवलेला आहे त्याला स्थानिक मुख्याध्यापक किंवा संस्था यांच्या सहकार्यातून आर्थिक व्यवहार करून वेगळ्या मार्गाने प्रवेश केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला ते सावंतवाडी येथील आयोजित…

Read More

कामगारांच्या एकीतच संघटनेचे बळ असते

अशोक सावंत;भाजप चित्रपट आघाडीच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकारी निवड कणकवली ता.२९-:* संघटित किंवा असंघटित कामगारांच्या संघटना मजबूत करण्यासाठी कामगारांनी एक मताने आणि एक दिलाने संघटनेचे काम करायला हवे . कामगारांमधील एकी हेच संघटनेचं बळ असते आणि यामुळेच आपले न्याय हक्क आपण मिळवू शकतो असे संबोधन कामगार नेते तथा भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी केले…

Read More

जिमखाना मैदान खेळपट्टीसाठी १६ लाख रुपये मंजूर

रुग्णवाहिकेसाठी आमदार निधीतून मिळणार निधी;आमच्या काळात दोन्ही ठराव घेतल्याचा आनंद:-संजू परब *सावंतवाडी ता.२९-:* सावंतवाडी जिमखाना मैदानासाठी खेळपट्टी साठी निधी मिळावा यासाठी आम्ही नगरपालिकेत असताना ठराव घेतला होता. यात आज वैशिष्टपूर्ण मधन १६ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. तसेच मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा…

Read More

दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन

नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचा इशारा सावंतवाडी ता.२९-:* राज्यातील नगरपंचायत , नगरपरिषद व संवर्ग कर्मचारी त्यांच्या मागण्या बाबत २२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली असून, आयुक्त तथा संचालक किरण कुलकर्णी यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन, या मागण्या योग्य असून, संचालक स्तरावर कोणतीही मागणी प्रलंबित राहणार नाही…

Read More

कणकवली दारीस्ते एसटी सुरु करा

शिवसेनेने वेधले आगार व्यवस्थापकांचे लक्ष कणकवली ता.२९-:* एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळापासुन कणकवली दारीस्ते एसटी बस सेवा आजपर्यंत बंद आहे. यामुळे शाळेतील मुलांची, रुग्णांची, वयोवृद्धांची तसेच पंचक्रोशीतील सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कणकवली दारीस्ते एसटी सेवा आजपर्यंत बंद असल्याने लोकांचे हाल होत असुन त्वरीत हि बस सेवा…

Read More

आजगाव चेअरमनपदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी

तर व्हाईस चेअरमनपदी सदानंद गवस यांची निवड सावंतवाडी ता.२९-:* आजगाव सोसायटीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सोसायटी चेअरमन म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी व व्हाईस चेअरमनपदी सदानंद गवस यांची निवड करण्यात आली आहे. आजगाव सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी १३ ही जागा…

Read More

वेंगुर्लेचा सुपुत्र तेजस मेस्त्री बनला सिंधुदुर्गातील पहिला संगीत “एम.ए गोल्ड मेडलिस्ट”…

*⚡वेंगुर्ले ता.२९-:* हिंदुस्थानी शास्त्रीय गायन विषयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिला संगीत “एम.ए गोल्ड मेडलिस्ट” बनण्याचा बहुमान वेंगुर्ल्याचा सुपुत्र तेजस मेस्त्री याने मिळविला आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल विभागातून त्याने ही पदवी प्राप्त केली. दरम्यान त्याच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तेजस विजयानंद मेस्त्री याची संगीतातील शिक्षणाची सुरुवात वेंगुर्ले येथील…

Read More

मोफत योग प्रशिक्षणाला प्रारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला न.प.आणि डॉ.वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने न.प.प्रशासकीय इमारती नजिक, स्वामी विवेकानंद हॉल येथे २४ एप्रिलपासून सकाळी ६ ते ७.३० या वेळेत मोफत योग प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.वसुधा मोरे, अंबरीश मांजरेकर, अक्षदा मांजरेकर, मीरा सावंत, उर्वी गावडे,…

Read More

कॅम्प येथे २ मे रोजी शिवजयंती उत्सव

वेंगुर्ला ता.२९-:* वेंगुर्ला, कॅम्प येथे शिवजयंती उत्सव मंडळातर्फे सोमवार दि. २ मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी श्रीसत्यनारायण महापूजा व रात्रौ ९ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘साडेतीन शंकर‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शिवजयंती उत्सव मंडळाने केले आहे.

Read More
You cannot copy content of this page