रुग्णवाहिकेसाठी आमदार निधीतून मिळणार निधी;आमच्या काळात दोन्ही ठराव घेतल्याचा आनंद:-संजू परब
*सावंतवाडी ता.२९-:* सावंतवाडी जिमखाना मैदानासाठी खेळपट्टी साठी निधी मिळावा यासाठी आम्ही नगरपालिकेत असताना ठराव घेतला होता. यात आज वैशिष्टपूर्ण मधन १६ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. तसेच मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा देखील त्यांनी आभार मानले आहेत.
यावेळी परब बोलताना म्हणाले की मुख्याधिकारी यांनी हा विषय पकडून धरल्याने आज सावंतवाडीकरांना जे पाहिजे होते.ते मिळाल तसेच मला देखील याबाबत आनंद आहे की हा ठराव आम्ही पालिकेत असताना घेतला होता तो आज मंजूर होऊन आलाय चांदवाडी करण्याची आम्हाला प्रेम दिली व साथ दिली त्यामुळे आज हा निधी मंजूर झाले असल्याचे देखील परब यांनी सांगितले.
तसेच ॲम्बुलन्स देखील नगरपालिकेला मिळावी यासाठी देखील आम्ही ठराव घेतला होता तो देखील आता मंजूर झाला असून ती देखील आमदार निधीतून मिळणार असल्याचे त्यांनी परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.
