Headlines

नवोदय विद्यालयाच्या प्रश्नाबाबत शिवसेनेचे उद्या आंदोलन…

सावंतवाडी ता.२९-:* सांगेली येथील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेबाबत शिवसेनेने पुकारलेले आंदोलन उद्या होणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे दिली. दरम्यान सावंतवाडी तालुक्यातून ६७ विद्यार्थ्याने बोगस रित्या प्रवेश मिळवलेला आहे त्याला स्थानिक मुख्याध्यापक किंवा संस्था यांच्या सहकार्यातून आर्थिक व्यवहार करून वेगळ्या मार्गाने प्रवेश केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी रुपेश राऊळ बोलताना म्हणाले की आतापर्यंत पुकारलेल्या आंदोलनाला बर्‍यापैकी यश आले असून यातील जिल्ह्यातील दोन शाळांनी सदर हॉल तिकीट मागे घेतल्याचं कळवलेल आहे. मात्र दोन शाळा मात्र अपेक्षित अस सहकार्य करत नसल्याच त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सदर आंदोलने स्थानिक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. आम्ही कुठच्याही विद्यार्थ्यांचे भविष्य अडचणीत आणू इच्छित नाही. तो आमचा उद्देश नाही. विद्यार्थी जरी परजिल्ह्यातला असला तरी त्याला देखील आम्हाला अडचणीत आण्याचे नाही. परंतु, आमच्या स्थानिक मुलांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे ही आमची इच्छा व अपेक्षा आहे. त्यामुळे या आंदोलनात स्थानिक विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले आहे. यावेळी अशोक दळवी, अपर्णा कोठावळे ,तात्या वेंगुरलेकर,गजा नाटेकर, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page