Headlines

प पु भालचंद्र महाराज पतसंस्था खारेपाटणतर्फे कामगारांचा सत्कार

कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यातील प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या पतसंस्थेच्यावतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामीण पातळीवर सेवा देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विशेष सत्कार कार्यक्रम पतसंस्थेच्या कार्यलयात नुकताच सम्पन्न झाला. या कार्यक्रमाला पतसंस्थेच्या संचालिका सौ श्रद्धा विजय देसाई,सौ वर्षा विवेक ब्रम्हदंडे,पतसंस्थेचे ब्रँच मॅनेजर तथा मुख्यकार्य.अधिकारी शुभम मोरे,लिपिक सत्यवान खांडेकर, गणेश जामसंडेकर,रोहन होनाळे,…

Read More

कणकवली येथे आज कोकण नर्सरीचे उदघाटन

कृषी विकास प्रतिष्ठान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नर्सरी व्यावसायिक शेतकरी संघटनेचा पुढाकार सावंतवाडी ता.०३-:* “कृषी विकास प्रतिष्ठान” अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा नर्सरी व्यवसायिक शेतकरी संचालित “कोकण नर्सरी” (उषा कंस्ट्रक्शन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंचायत समिती जवळ, तेली आळी,) कणकवली या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 3 एप्रिल 2022 रोजी अक्षय तृतीया च्या शुभमुहूर्तावर सायंकाळी 4 वाजता होणार…

Read More

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

कणकवली ता.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या 60 रिक्त जागांवर पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यात 7 ग्रामपंचायत मध्ये 11 जागांकरिता पोट निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 13 ते 20 मे पर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून, 23 मे रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार…

Read More

फोंडाघाट महावितरणच्या कार्यालयावर शिवसेनेची धडक

महावितरणचे शाखा अभियता यांना विचारला जाब *⚡कणकवली ता.०३-:* फोंडाघाट महावितरणचे शाखा अभियता वीज जोडणी करीता सर्वसामान्य जनतेकडून जादा रक्कमेची मागणी करत असल्याच्या तक्रारी जि. प. सदस्य संजय आंग्रे यांच्याकडे आल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थानी फोंडाघाट महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेत येथील शाखा अभियंता कांबळे याना जाब विचारला.      फोंडाघाटमधील एका ग्राहकाला कारखाना सुरू…

Read More

पी.एफ आणि वर्षातून किमान दोन वेळा हेल्थ कॅम्प लावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषध कर्मचारी आयोजित कर्मचारी मेळावा कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्गातील औषध कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे औषध व्यवसायात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आले.या प्रसंगी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाच्या काळात कसलाही विचार न करता जी सेवा दिलीय त्या सर्वांचेच आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला…

Read More

डेगवे-आंबेखणवाडी ब्राह्मणीस्थळाच्या प्रवेशद्वारास उल्हास देसाई परीवारातर्फे देणगी

बांदा ता.०३-:* सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळाचे मुख्य प्रवेशद्वारास डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र उल्हास बाबाजी देसाई आणि बंधू परीवारातर्फे रुपये 51,000/-ची भरीव देणगी देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे. या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर…

Read More

रस्त्यावर सापडलेला महागडा मोबाईल वाहतूक पोलिसांनी पर्यटकास केला परत

मालवण ता.०२-:* मालवण कसाल मुख्य मार्गावरील आनंदव्हाळ येथील रस्त्यावर आज सोमवारी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना सापडलेला ऍप्पल कंपनीचा महागडा मोबाईल पोलिसांनी संबंधित मोबाईलधारक व्यक्तीचा शोध घेऊन त्यास मोबाईल परत केला. ड्युटीवर असताना पोलिसांनी दाखविलेल्या या कार्यतत्परतेचे सर्वांकडून कौतुक होत आहे. आनंदव्हाळ येथे मुख्य रस्त्यावर ड्युटी करत असणारे वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस हवालदार डी. एस. तारी, पोलीस…

Read More

मालवणात शिवसेनेच्यावतीने पारंपारिक शिवजयंती साजरी

आम वैभव नाईक यांची उपस्थिती *⚡मालवण ता.०२-:* जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… असा जयघोष करत… ढोल ताशांचा गजरात, भगव्या पताका फडकवित आज मालवणात शिवसेनेकडून भव्य मिरवणूक काढत वैशाख वद्य द्वितीया तिथीनुसार पारंपारिक पद्धतीने होणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या मिरवणुकीस आम. वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवली. यानिमित्त मालवण शिवसेना…

Read More

कलेचा वारसा जोपासण्यासाठी लोककला विकास मंच स्थापन

अध्यक्ष जनीकुमार कांबळे वैभववाडी प्रतिनिधी आंबेडकरी चळवळ खेड्यापाड्यात पोहचवून जनतेचे प्रबोधन करण्याचे काम कवी गायकांनी केले आहे.या परंपरेचा वारसा जपण्यासाठी लोककला विकास मंच सिंधुदुर्ग स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन अध्यक्ष जनीकुमार कांबळे यांनी केले. लोककला विकास मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने व बुरबांवडे बौध्द विकास मंडळ यांच्यासहकार्याने आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कवी गायक यांचा सत्कार पंचशील बुध्दविहार बुरबांवडे येथे…

Read More

वीज वितरणच्या गणेश पाटेकर याना आदर्श तारमार्ग कर्मचारी पुरस्कार

सर्वत्र होतेय अभिनंदन वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी वीज वितरण कंपनीमध्ये प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे सेवा बजावणारे प्रधान तंत्रज्ञ गणेश अनंत पाटेकर यांना वीज वितरणचा उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्त गणेश पाटेकर यांचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे….

Read More
You cannot copy content of this page