अध्यक्ष जनीकुमार कांबळे
वैभववाडी प्रतिनिधी आंबेडकरी चळवळ खेड्यापाड्यात पोहचवून जनतेचे प्रबोधन करण्याचे काम कवी गायकांनी केले आहे.या परंपरेचा वारसा जपण्यासाठी लोककला विकास मंच सिंधुदुर्ग स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन अध्यक्ष जनीकुमार कांबळे यांनी केले.
लोककला विकास मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने व बुरबांवडे बौध्द विकास मंडळ यांच्यासहकार्याने आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कवी गायक यांचा सत्कार पंचशील बुध्दविहार बुरबांवडे येथे करण्यात आला. यावेळी मंचचे सचिव तथा सेवानिवृत्त तहसिलदार भरत नाईक, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, रविंद्र पवार, ए.पी.कदम, रविंद्र शिंगे, राजेश कांबळे, सागर पोमेडकर, संजय जंगम, शरद कांबळे, राजेद्र कांबळे, मारुती कांबळे, विलास कुणकवणकर, विजय नाडणकर, प्रकाश आजविलकर, खारेपाटण विभाग बौध्द सेवा संघाचे अध्यक्ष मोहन पगारे, सचिव मंगेश कांबळे यांच्यासह कवी गायक उपस्थित होते.
यावेळी कवी गायक दिवगंत राहुलकुमार शिंगे, प्रभाकर पोमेडकर, प्रकाश जाधव यांच्या स्मरणार्थ एक राञ भीम बुध्द गीतांचा जागर हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात १७ गायकांनी आपली कला सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली. यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ८१ वर्षाचे गणेश तुळसणकर यांनी त्यांनी त्यांनी सादर केलेल्या गीतांनी सर्वांना प्रेरणा मिळाली.
अध्यक्ष जनीकुमार कांबळे यांच्याहस्ते दिवंगत राहुलकुमार शिंगे यांच्या गीतांचे पुस्तक प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूञसंचलन श्रीपत कुसूरकर यांनी तर आभार राजेश कांबळे यांनी मानले. फोटो- जेष्ठ कवी गायक गणेश तुळसावडेकर यांचा सत्कार करतांना मंचचे अध्यक्ष जनीकुमार कांबळे . छाया संजय शेळके वैभववाडी
