Headlines

तर विजयदुर्ग किल्ल्यावर महाराष्ट्र दिनी ध्वज फडकविणार

पालकमंत्री उदय सामंत सिंधुदुर्गनगरी ता २० सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम तिरंगा फडकविण्यात येणारा विजयदुर्ग हा एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्यावर शासनाची मान्यता मिळाल्यास १ मे २०२३ या महाराट्र दिनी ध्वज फडकविण्यात येईल. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना…

Read More

सात कोटींच्या कामांना जिल्हा नियोजन सभेत मंजुरी

जिल्ह्यातील 10 नद्यांमधील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मान्यता सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, गारपीट अंतर्गत करावयाच्या उपाययोजना संदर्भात 6 कोटी 98 लक्ष रक्कमेच्या 84 कामांना आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून पूरनियंत्रण कामे योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 10 नद्यांमधील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना आयत्यावेळच्या विषयात मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री उदय सामंत…

Read More

9625988601 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचा फोटो डीपीला लावून 9625988601 या क्रमांकावरून खोटे संदेश विविध अधिकाऱ्यांना पाठवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या क्रमांकावरून आलेल्या संदेशावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. याबाबत तपास करून कारवाई करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे.

Read More

कणकवली शाळा नं ५च्या इमारत दुरूस्तीसाठी निधी मिळावा

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे पालकमंत्र्यांना निवेदन *⚡कणकवली ता.२०-:* जि. प. प्राथमिक कणकवली शाळा नं ५ च्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत श्रीधर नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांना लेखी निवेदन दिले आहे. कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील जळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ५ या शाळेच्या इमारतीचे छप्पर कोसळले असून त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे हे…

Read More

गोसावी टेंब येथील सिद्ध महापुरुष समाधी मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.२०-:* कारिवडे गोसावी टेंब येथील सिद्ध महापुरुष समाधी मंदिराचा वर्धापन दिन व भैरीनाथा च्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा उत्साहात संपन्न झाला, यावेळी सिद्ध महापुरुष सेवा मंडळ कारिवडे यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या,तर विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, यात माजी…

Read More

कणकवली येथे उद्यापासून सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव

कोकणातील उद्योजकांचा विकास साधणार;ना.राणे यांच्या हस्ते उद्घाटन *⚡कणकवली ता.२०-:* कोकणातील उद्योजकांचा विकास व्हावा, कोकणात नविन उद्योजक तयार व्हावेत या उद्देशाने केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने एमएसएमई विकास संस्थान मुंबईच्यावतीने कणकवली स्टेशन रोड, उपजिल्हा रुग्णालयासमोर २१ ते २३ मे, २०२२ या कालावधीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मे रोजी…

Read More

कणकवली शहरात नालेसफाईची कामे पूर्वीच सुरू

शिवसेनेचे आरोप चुकीचे; आरोग्य सभापती संजय कामतेकर यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२०-:* कणकवली शहरातील नालेसफाई सुरू करून दहा दिवस उलटले. कणकवली शहरातील मान्सूनपूर्व कामांवर नगरपंचायतने आराखडा तयार केला असून त्यानुसार नगरपंचायत कर्मचार्‍यांचे काम सुरू आहे. शहरातील 19 ठिकाणची कामे मार्गी लागली आहेत. व उर्वरित जवळपास 22 कामे येत्या दहा दिवसात पूर्ण होतील. मात्र एवढे होऊन…

Read More

पिकुळा तीठा ते उसप खोक्रल रस्त्याचे काम अर्धवट

उसप सरपंच दिनेश नाईक यांचा आंदोलनाचा इशारा दोडामार्ग ता.२०-:* सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पिकुळा तिठा ते उसप खोक्रल रस्त्यावर असलेल्या नाल्यावर काही महिन्यांपूर्वी पुल बांधकाम केले पण जोड रस्ता तयार करण्यासाठी खडी टाकली पण पावसाळा सुरु झाला तरी संबधित ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही.जो पर्यायी रस्ता तयार केला तो पावसामुळे धोकादायक बनला आहे. गाड्या रूतत…

Read More

मांगेलीची तेजल गवस झाली डॉक्टर

शिक्षणासाठी केला खडतर प्रवास;तेजलचे होत आहे अभिनंदन दोडामार्ग ता.२०-:* दोडामार्ग तालुक्यातील दूर्गम डोंगराळ भागात वसलेला गाव मांगेली येथे शिक्षणाची फारशी सुविधा नाही अशा ग्रामिण भागात जन्म घेतलेल्या शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाऊन वैद्यकिय शिक्षण घेतलेली मांगेली गावातील कु.तेजल विजय गवस हिने एम.बी.बी एस होऊन डाॅक्टर बनली आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वञ कौतुक होताहे.माजी सरपंच विजय गवस यांची…

Read More

लक्ष्मीनारायण वर्धापनदिन २२ रोजी

वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला, खांबड-भटवाडी येथील श्री देव लक्ष्मीनारायणाचा वार्षिक वर्धापनदिन रविवार दि. २२ मे रोजी भक्तिभावाने संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी लक्ष्मीनारायणाची पूजा, १० वा. श्रीसत्यनारायण महापूजा, रात्रौ ७.३० वा. पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थप्रसाद व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन श्री देव…

Read More
You cannot copy content of this page