Headlines

रायवळ आंबा संवर्धनासाठी युवा सेनेने उचलले पाउल

⚡कणकवली ता.१३-: युवासेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रायवळ आंबा संवर्धनासाठी रायवळ आंबा वृक्षारोपण करण्यात आले. कणकवली नाथ पै नगर येथील भागात आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जेष्ठ नागरिक दादा कुडतरकर यांच्या हस्ते रायवळ आंब्याचे वृक्षारोपण…

Read More

मळगाव ब्रीजखाली रेल्वे ट्रॅकवर सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह…

सावंतवाडी ता.१२-:मळगाव ब्रिजखाली रेल्वे ट्रॅकवर अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. संबंधित महिलेचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाला की, तिने आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही

Read More

आचरेत साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१३-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखा आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं.१ येथे साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या पुस्तकातील “जीवनयोगी साने गुरुजी” या पुस्तकातील काही निवडक भागांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते रवींद्र…

Read More

साने गुरुजींच्या विचारधारेने प्रेरीत शिक्षकांचे कार्य आदर्शवत – उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे

गुरुवर्य य. बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना प्रदान ⚡मालवण ता.१३-: बॅ. नाथ पै सेवांगणच्या मालवण व कट्टा शाखेने शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विद्यार्थांसाठी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन शिक्षणाची चळवळ समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचविण्याची उत्तम कामगिरी केली आहे. साने गुरुजींच्या विचारधारेने प्रेरीत शिक्षकांचे कार्य आदर्शवत आहे. गुरुनाथ ताम्हणकर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम…

Read More

भाजपा ‘लोकसभा प्रवास योजना’ अभियान संयोजकपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती

⚡कणकवली ता.१३-: भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, विद्यमान प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांची लोकसभा प्रवास योजनेच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भाजपा पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या काही मतदारसंघात संघटन बांधणी जोमाने सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे.येत्या 18 महिन्याच्या कालावधीत संबंधित लोकसभा मतदारसंघ आणि त्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ जिकण्याची तयारी या अभियानाच्या…

Read More

वॉर्ड ३ अ अनुसूचित जातीसाठी आरक्षित

उर्वरित १९ पैकी १० जागा सर्वसाधारण महिलांसाठी मालवण दि प्रतिनिधी आगामी मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरातील नव्या प्रभाग रचनेनुसार १० प्रभागांमधील प्रत्येकी दोन अशा एकूण २० जागांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत लोकसंख्येच्या निकषानुसार शहरातील वॉर्ड क्र. ३ “अ” हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. तर १९ पैकी १० जागा या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित…

Read More

आम्ही जायचे कुठे… ?

कलबिस्त ख्रिश्चनवाडी ग्रामस्थांचा तहसीलदारांना प्रश्न;नदीतील गाळ काढण्याची, संरक्षक भिंत उभारण्याची दहा वर्षे करीत आहेत मागणी ⚡सावंतवाडी ता.१३-: कलंबिस्त ख्रिश्चनवाडी नजीक वाहणाऱ्या नदीतील गाळ काढण्याची तसेच संरक्षक भिंत उभारण्याच्या मागणीबाबत दहा वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न करता येत्या पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्याने कलंबिस्त ख्रिश्चनवाडीतील संतप्त रहिवाशांनी सोमवारी सकाळी सावंतवाडी तहसिल कार्यालय गाठून याचा…

Read More

जागतिक बाल कामगार दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१३-: १४ मे १८ वर्षाखालील बाल कामगारांना प्राथमिक शालेय शिक्षण हे अत्याश्यक असल्याने त्यांना शिक्षणापासून कुणीही वंचित ठेवू नये. यासाठी शासनाने कायद्याने तसा अधिकार बाल कामगारांसाठी केलेला आहे. त्यामुळे कोणतेही व्यावसायिक अशा मुलांना या कायद्याचे उल्लंघन करून स्वःतचा स्वार्थ साधून शकत नाहीत. तसे झाल्यास संबंधित व्यावसायिकांस कायद्याने शिक्षा होऊ शकते. त्यामुळे व्यावसायिकांनी त्याची दक्षता…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

२० जागांपैकी १ जागा अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी राखीव ⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला येथील नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १० प्रभागातील २० जागांसाठी आज नगरपरिषदेच्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरक्षण प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील अ जागेसाठी अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण असे आरक्षण पडले असून ब जागेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तर उर्वरित ९…

Read More

कै.श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन ही श्रीधर नाईक यांना आम्ही वाहिलेली श्रध्दांजली

भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा टोला ⚡कणकवली ता.१३-: कणकवली शहराचा विकास करताना आम्ही राजकीय श्रेयवाद करत नाही हे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटनावरून सिद्ध होते. उद्यान नूतनीकरणसाठी 75 लाखांचा निधी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पाठपुरावा करून आणला होता. 22 जून रोजी कै.श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन ही श्रीधर नाईक यांना आम्ही वाहिलेली श्रध्दांजली आहे….

Read More
You cannot copy content of this page