रायवळ आंबा संवर्धनासाठी युवा सेनेने उचलले पाउल

⚡कणकवली ता.१३-: युवासेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रायवळ आंबा संवर्धनासाठी रायवळ आंबा वृक्षारोपण करण्यात आले.

कणकवली नाथ पै नगर येथील भागात आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, जेष्ठ नागरिक दादा कुडतरकर यांच्या हस्ते रायवळ आंब्याचे वृक्षारोपण करण्यात आले. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 रायवळ आंब्याच्या वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. खाण्यास योग्य आणि सर्वांच्या आवडीचा म्हणून हापूस, तोतापुरी, पायरीसारख्या आंब्याच्या संकरीत जातीची रोपे लावण्याचे फॅड गावागावात रूजले आहे. रायवळी आंब्याची अनेक झाडे इमारत बांधकामाबरोबरच सरपणासाठी झपाट्याने तोडली जात असल्याने रायवळी आंब्याची झाडे हद्दपार होऊ लागली आहेत. त्यामुळे रायवळ आंबा संवर्धनासाठी एक पाउल टाकत पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवासेनेच्या वतीने रायवळ आंब्याची १०० झाडे लावण्यात येणार आहेत. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, मानसी मुंज, युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, निसार शेख, शहरप्रमुख शेखर राणे, युवा सेना शहरप्रमुख आदित्य सापळे, दादा कुडतरकर,राजू राठोड, ललित घाडीगांवकर, उत्तम लोके, समीर आचरेकर, वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर,कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, बाळू पारकर, संदीप राणे, राजू म्हाडगुत, सिद्धेश राणे,तेजस राणे, मनोहर पालयेकर, प्रल्हाद सावंत, अशोक राणे, दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page