अधीक्षकांनी दिली उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांना चौकशीचे आदेश
⚡ओरोस ता.१३-: सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे संस्थापक सदस्य वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मृत दाखवून त्यांचे सभासदत्व रद्द केल्याप्रकरणी आणि पत्रकार विनायक गावस याच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली दरम्यान याप्रकरणी सावंतवाडी पोलीस उपअधीक्षक सौ रोहिणी साळुंखे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी यावेळी दिले.
जिल्हा पत्रकार संघाच्या या शिष्टमंडळा मध्ये अध्यक्ष गणेश जेठे सचिव उमेश तोरस्कर खजिनदार संतोष सावंत ज्येष्ठ पत्रकार वसंत अण्णा केसरकर अशोक करबळेकर जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य हरिश्चद्र पवार बाळ खडपकर सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रवीण मांजरेकर माजी अध्यक्ष विजय देसाई तालुका खजिनदार रामचंद्र कुडाळकर सिंधुदुर्गनगरी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे सावंतवाडी तालुका समिती कार्यकारणी पदाधिकारी मोहन जाधव नरेंद्र देशपांडे रवि गावडे गुरुप्रसाद दळवी आदी उपस्थित होते
वसंत केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन चे संस्थापक सदस्य असून ते जिवंत असताना मयत दाखवून त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले असून या प्रकरणी सावंतवाडी पोलिसात तक्रार अर्ज देण्यात आला आहे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन संबंधितावर कारवाई करण्याचेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते मात्र अद्यापही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर आज सोमवारी जिल्हा पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन याप्रकरणी
तात्काळ संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी केली.
याप्रकरणी तात्काळ तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी महिला पोलीस उपअधीक्षक सौ रोहिणी साळुंखे यांना दिले
दरम्यान वसंत उर्फ अण्णा केसरकर यांना ते जिवंत असताना मयत असल्याचे कागदपत्रे दाखवून तसा अहवाल कबड्डी असोसिएशनने धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर केला व त्यांचे सदस्यत्व रद्द केले याबाबतची कागदपत्रे माहितीच्या अधिकारात केसरकर यांनी घेऊन पत्रकार परिषदेत संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली तर सावंतवाडी येथील पोलीस स्थानकात लेखी तक्रारही दाखल केली मात्र यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेले नाही ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच सावंतवाडी येथे वीज महावितरण कंपनीच्या विरोधात झालेल्या आंदोलन प्रकरणी पत्रकार विनायक गावस यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेली ही कारवाई चुकीची असून पोलीस आणि पत्रकार हे सरकारी कामाच्या सीमारेषेवर असतात त्यामुळे आतापर्यंत पत्रकारांवर अशा प्रकारचे गुन्हे झालेले दाखल करण्यात आले नव्हते पत्रकार आणि पोलीस यांच्यामधील संबंध सलोख्याचे असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आत्तापर्यंत जिल्ह्यात पत्रकारांची मदत झाली आहे त्यामुळे पत्रकार गावस यांच्याविरुद्ध करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचे बाब जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली याबाबतही योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी दिले.
