आचरेत साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१३-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखा आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं.१ येथे साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. त्यावेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या पुस्तकातील “जीवनयोगी साने गुरुजी” या पुस्तकातील काही निवडक भागांचे अभिवाचन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते रवींद्र मुणगेकर तथा वाघ काका होते. व्यासपीठावर आचरे केंद्रप्रमुख सुगंधा केदार गुरव, केंद्रशाळा आचरेच्या मुख्याध्यापक स्मिता सदाशिव जोशी, नाथ पै सेवांगण मालवणचे व्यवस्थापक संजय भीमसेन आचरेकर, साने गुरुजी वाचन मंदिर मालवणचे ग्रंथपाल संजय रोगे, आचरे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या महिला प्रमुख मनाली फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी साने गुरुजींवर माहितीपर भाषणे केली.

यावेळी प्रतिवर्षीप्रमाणे बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने पंचक्रोशीतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधीचे वाटप करण्यात आले. साने गुरूजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी कथामाला आणि सेवांगण यांचे कार्य विषद केले.

पांडुरंग गुरुदास कोचरेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन केले होते. रावजी तावडे यांनी आभार मानले. यावेळी रामकृष्ण रेवडेकर, मृणालिनी आचरेकर, सायली परब, संजय जाधव, संतोष वरक, अमृता मांजरेकर, परशुराम गुरव, नवनाथ भोळे, संजय परब आदी कथामाला कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page