भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा टोला
⚡कणकवली ता.१३-: कणकवली शहराचा विकास करताना आम्ही राजकीय श्रेयवाद करत नाही हे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या उदघाटनावरून सिद्ध होते. उद्यान नूतनीकरणसाठी 75 लाखांचा निधी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पाठपुरावा करून आणला होता. 22 जून रोजी कै.श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन ही श्रीधर नाईक यांना आम्ही वाहिलेली श्रध्दांजली आहे. माहिती भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरसेवक शिशिर परुळेकर म्हणाले,
कणकवली शहरातील नूतनीकरण केलेल्या कै.श्रीधर नाईक उद्यानाचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते येत्या 22 जून रोजी करण्यात येणार आहे.एकीकडे दहशतवादावर बोलणारे पारकर बंधू 3 वर्षे राणे कुटुंबियांच्या वळचणीला जाऊन बसले होते. विद्यमान केंद्रीयमंत्री राणेंच्या कृपेने संदेश पारकर याना महामंडळाची लॉटरी लागली. राणेंकडे मागितली म्हणूनच संदेश पारकर यांना लाल दिव्याची गाडी मिळाली होती. त्यामुळे राणेंकडून राजकीय लाभ मिळवलेल्या आणि नैतिकता नसलेल्या पारकर बंधूनी जनाची नाही पण मनाची लाज बाळगून 22 जून रोजी होणाऱ्या उदघाटनाला उपस्थित राहू नये असा टोला नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी लगावला.
