Headlines

मालवणात उद्या सामूहिक योग सत्राचे आयोजन…

⚡मालवण ता.२०-:आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (NCC विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सामूहिक योग सत्राचे आयोजन दि. २१ जून रोजी सकाळी ठीक ८ ते ८.४५ यावेळेत मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते…

Read Full News

आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण आगारात नव्या पाच बस दाखल…

⚡मालवण ता.२०-:मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बस दाखल होत आहेत. उद्या रविवार २१ जून पर्यत या बसेस मालवण बस स्थानकाच्या ताफ्यात दाखल होऊन प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील. आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून या बसेस मालवण बसस्थानकला प्राप्त झाल्या आहेत. तसेच यापुढे आणखीही नव्या बस प्राप्त होतील. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप…

नगरसेविका तन्वी चांदोस्कर व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांचा वतीने केलंय आयोजन.. ⚡देवगड ता.२०-:महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देवगड-जामसंडे परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत व्हावी या उद्देशाने ५०० शालेय बॅगचे…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र तिर्लोटकर यांचा लोकोपयोगी उपक्रम…

देवगडमध्ये मोफत आधार सेवा, फार्मर आयडी नोंदणी व विविध शासकीय सुविधांचे आयोजन; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन . ⚡देवगड ता.२०-:महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, देवगड (पडेल मंडल) यांच्या वतीने नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी सेवांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे संकल्पक व प्रमुख संयोजक…

Read Full News

स्वच्छ समुद्रकिनाऱ्याचे आकर्षण महागात; मिठमुंबरी बीचवर पर्यटकांची कार वाळूत रुतली…

सूचनाफलक नसल्याने हरियाणातील पर्यटक अडचणीत; स्थानिकांच्या मदतीने संकटातून सुटका.. ⚡देवगड ता.२०-:देवगड तालुक्यातील मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर हरियाणातून आलेल्या पर्यटकांच्या कारला वाळूत रुतल्याने मोठी अडचण निर्माण झाली. सुदैवाने स्थानिकांच्या तत्पर मदतीमुळे कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आणि पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला. हरियाणातील एक पर्यटक कुटुंब शुक्रवारी कोकण पर्यटनासाठी आले होते. देवगडहून कुणकेश्वरकडे जात असताना तारामुंबरी पुलाजवळून प्रवास करताना…

Read Full News

देवगड हायस्कूलमध्ये १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ..

⚡देवगड, ता.२०-: शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, प्राध्यापिका सुहासिनी कदम, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. सरस्वती पूजनानंतर दहावीतील १६ व बारावीतील ३ अशा एकूण १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू…

Read Full News

पुनर्तपासणीनंतर व्ही.एन. नाबर प्रशाळेचा निकाल उज्ज्वल; दुर्वा वारंग ९९.२० टक्क्यांसह अव्वल…

⚡बांदा ता.२०-: येथील व्ही.एन नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशाळेचा दहावी परीक्षेचा पुर्नतपासणी नंतरचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या प्रशाळेतील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पुर्नतपासणीसाठी निकालासाठी पाठवण्यात आला होता. हा निकाल पुन्हा एस.एस.सी बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने पाठवला आहे. पुर्नतपासणीनंतर काही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. नवीन पुर्नतपासणीनंतरचा व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश…

Read Full News

सावंतवाडीत पाच दिवसीय मोफत योगशिबिराला उत्साहात प्रारंभ…

⚡बांदा ता.२०-: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषद, घे भरारी फाउंडेशन आणि फिटनेस योग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 दिवसीय मोफत योगशिबिराचा प्रारंभ आज सकाळी 6.30 वाजता जिमखाना हॉल येथे उत्साहात झाला.या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिराचे अध्यक्ष म्हणून योग शिक्षक शेखर बांदेकर उपस्थित होते. याप्रसंगी फिटनेस…

Read Full News

अजित गाडगीळ यांना महाराष्ट्र दशावतार कलारत्न गौरव पुरस्कार…

⚡सावंतवाडी ता.२०-: मळेवाड येथील युवा दशावतार नाट्यकथा लेखक जे बरीच वर्षे दशावतार नाट्य कलेचे लेखन करून आपली कला सादर करताहेत.या हरहुन्नरी लेखन कलेची आवड असलेल्या अजित गाडगीळ यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्य, योगदान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व यासाठी युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन (रजि.) यांच्या वतीने “सर्वोत्तम व्यक्तिमत्व पुरस्कार सन्मान २०२६” (ठाणे) साठी निवड करून त्यांना महाराष्ट्र दशावतार कलारत्न…

Read Full News

कणकवली नगरपंचायतमार्फत ‘एकल महिला दिवस’ साजरा होणार…

मंगळवारी सकाळी ११ वाजता नगर वाचनालय हॉल येथे कार्यक्रम.. ⚡कणकवली ता.२०-: महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे ‘एकल महिला धोरण’ तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याअनुषंगाने २३ जून रोजी साजरा होणारा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ यंदा ‘एकल (विधवा) महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ जन आजीविका योजना-शहरी (DJAY-S) तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या…

Read Full News

You cannot copy content of this page