Headlines

शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मज्जिद बटवाले

⚡कणकवली ता.०५-:शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी कणकवली तालुक्यातील मज्जिद अब्बास बटवाले यांची नियुक्ती जाहीर केली.कणकवली विजय भवन येथे अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी मज्जिद बटवाले यांना उपनेते गौरीशंकर खोत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी नियुक्ती पत्र देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी…

Read More

रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा

पोलिसांनीही केले कौतुक ⚡कणकवली ता.०५-:रिक्षाने कणकवलीहून ओरोस येथे सोडलेल्या महिला प्रवाशाची बॅग रिक्षातच राहील्याचे रिक्षाचालक सिद्धू उर्फ सिद्धार्थ शिवराम कदम (४०, वरवडे ) यांच्या लक्षात आले. त्यांनी बॅग कणकवली पोलीस ठाण्यात सुपूर्द केली. पुढे बॅगेत सापडलेल्या कागदपत्रानुसार पोलिसांनी महिलेशी संपर्क साधून बॅग तिच्याकडे सुपूर्द केली. सिद्धार्थ यांच्या प्रमाणिकपणाचे पोलिसांनीही कौतुक केले. घटना अशी, सिद्धार्थ हे…

Read More

नांदरुख गावच्या ऐतिहासिक महत्वाचा मागोवा घेणारी कार्यशाळा संपन्न

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील नांदरुख गावास लाभलेले ऐतिहासिक महत्व आणि त्यादृष्टीने जोडलेल्या घटना, स्थळे, देवालये आणि पुढे घडलेला विकास यांचा मागोवा घेणारी कार्यशाळा संपन्न झाली. नांदरुख, ग्रामपंचायत, ग्रामसेवा संघ नांदरुख,’ शिवसृष्टी नांदरुख ‘ व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख अंबडोस येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मालवण शहर, देवबाग, तारकर्ली,…

Read More

परशुराम उपरकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गणपतीचे घेतले दर्शन

⚡सावंतवाडी ता.०५-: मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी काल सावंतवाडी तालुक्यात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक व्यापारी व इतर राजकीय मंडळींच्या घरी गणेश दर्शन घेतले त्याचप्रमाणे गुळदुवे येथील दहावीच्या परीक्षेत उत्तम प्रकारे गुणसंख्या घेऊन उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार श्री उपरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देत करण्यात आला. सदर सत्कार…

Read More

सिंधुदुर्ग बँकेच्या मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज पुरवठा

⚡मालवण ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज घेतलेल्या तिघांना जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या उपस्थितीत उद्योजक डॉ दीपक परब यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, शाखाधिकारी संतोष गावकर, शिवराज सावंत, बँक कॅशीयर महेश गुराम, लिपिक विनीत लुडबे, शरद ठाकूर,…

Read More

पाटगाव आंजिवडे घाटमार्गाचा प्रश्न सोडवा

मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी : पाटगाव ला भेट सावंतवाडी :कोल्हापूर सिंधुदुर्ग ला जोडणाऱ्या जवळचा असा आंजिवडे पाटगाव घाटमार्गाचा प्रश्न लवकर सोडवा अशी मागणी पाटगाव (जि.कोल्हापूर)येथील ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.याबाबतचे सहयाचे निवेदनही त्यांना देण्यात आले.मंत्री केसरकर हे पाटगाव येथे आले असता सरपंच विलास देसाई नंदकुमार ठाकूर यांच्यासह अजिंक्य ग्रुप कला क्रिडा…

Read More

पाच दिवसांच्या बाप्पांचे जल्लोषात विसर्जन

⚡बांदा ता.०४-: ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या अशा जयघोषात न्हावेली, पाडलोस, आरोस परिसरातील पाच दिवसांच्या बाप्पांचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. पावसाच्या विश्रांतीमुळे लहानांपासून थोरांपर्यंतचा उत्स्फूर्त सहभाग आणि बाप्पांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.

Read More

आंबोलीतील अवैद्य दारुधंदे बंद करण्यासंदर्भात आंबोली, चौकुळ सरपंचाची पोलीसांशी चर्चा

⚡आंबोली ता.०४-: आंबोली, चौकुळ मधील अवैद्य दारु धंदे बंद करणेबाबत आंबोली व चौकुळ सरपंचानी आंबोली पोलीसांशी आज चर्चा केली.यावेळी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ, माजी सरपंच गुलाबराव गावडे, संतोष पालेकर, मंगलबाबु व ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने बाहेरील गाड्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही गावात…

Read More

सावंतवाडी शहर व तालुक्यातील पाच दिवसीय बाप्पांचे थाटात विसर्जन

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरातील पाच दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.तसेच तालुक्यातील पाच दिवसीय गणपती बाप्पांचे उशिरापर्यंत विसर्जन चालू होते. सावंतवाडी शहरातील पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला…

Read More

गौरी पूजन भक्तिमय वातावरणात

वेंगुर्लेत परंपरेनुसार गौरी पूजन ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात काही घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आज रविवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गौरी पूजन करण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page