सिंधुदुर्ग बँकेच्या मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज पुरवठा

⚡मालवण ता.०४-:
सिंधुदुर्ग जिल्हा बँक मसुरे शाखेच्या वतीने वाहन कर्ज घेतलेल्या तिघांना जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या उपस्थितीत उद्योजक डॉ दीपक परब यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, शाखाधिकारी संतोष गावकर, शिवराज सावंत, बँक कॅशीयर महेश गुराम, लिपिक विनीत लुडबे, शरद ठाकूर, आदर्श शिक्षक शिवराज सावंत, प्रशांत परब, सौ गौरी चव्हाण, रोहन म्हाडगुत आदी उपस्थित होते. मसुरे शाखेकडून ग्राहकांना मिळणाऱ्या ग्राहकाभिमुख व तत्पर सेवे बद्दल यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. आभार शाखाधिकारी संतोष गावकर यांनी मानले.

You cannot copy content of this page