Headlines

न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा क्रिडा संकुल ओरोस येथे संपन्न झाली. यात उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या रमाकांत विकास बागायतकर याने १७ वर्षाखालील ७१ किलो वजनी गटातत अजिक्यपद पटकाविले. त्याची कोल्हापूर येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला हर्षद मोर्जे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. फोटो – रमाकांत बागायतकर

Read More

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टच्यावतीने 17 रोजी कणकवलीत चित्रकला स्पर्धा

⚡कणकवली ता.०७-: कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध गटात आयोजित केली असून कणकवली येथील विद्यामंदीर हायस्कूलमध्ये 17 डिसेंबर ला सकाळी 11 ते 1 वा. या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  चित्रकला स्पर्धेचे गटनिहाय विषय पुढिलप्रमाणे : (पाचवी ते सहावी) –…

Read More

उड्डाण पुलाच्या बॉक्सेलचे बांधकाम पुन्हा नव्याने करणार

कणकवलीत दुतर्फा सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू ठेवणार ⚡कणकवली ता.०७-: कणकवली शहरातील एस. एम. हायस्कुलनजीकचे उड्डाण पुलाच्या बॉक्सेलचे बांधकाम येत्या आठवड्याभरात तोडण्यात येणार आहे. त्यासाठी उड्डाणपूल बंद राहणार आहे. 4 ते 5 महिन्यांत हे बांधकाम पूर्ण होऊन उड्डाणपुलावरून पूर्ववत वाहतूक होईल. दरम्यानच्या काळात दुतर्फा सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सूत्रांकडून…

Read More

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली निगुडे गावाला भेट

ग्राम पंचायत निवडणुकीचा घेतला आढावा ⚡बांदा ता.०७-: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील माहिती घेण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्रीम. रोहिणी सोळुंखे व बांदा पोलीस निरीक्षक श्री शामराव काळे यांनी निगुडे गावाला भेट दिल. यावेळी निगुडे ग्रामसेविका श्री. तन्वी गवस यांनी डॉ. सोळुंके यांचे शाल श्रीफळ देऊन ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे,…

Read More

संचयनी समोरील विद्युत पोल बनलाय धोकादायक

वीज वितरण कंपनीने तात्काळ बदलावा;सामाजिक बांधिलकी संघटनेची मागणी ⚡सावंतवाडी ता.०७-: संचयनी बिल्डिंग समोरील रस्त्यावरील विद्युत वाहिनी पोल पूर्णपणे जीर्ण झाला असून, तो कधीही कोसळून मोठा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असून, विद्युत विभागाने तो पोल तातडीने बदलावा अशी मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Read More

बेळगाव मराठी भाषिकांवर अन्याय

महाराष्ट्र एकीकरण समिती जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी केला निषेध ⚡सावंतवाडी ता.०६-: बेळगाव  येथील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आणि सद्यस्थितीमध्ये सुरू झालेल्या तोडफोडीचा महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला बाळासाहेबांची शिवसेना पक्ष म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्न तोंड उघडावे बाळासाहेबांनी केलेले आंदोलन आठवावे…

Read More

कणकवली येथील शरद पारकर यांचे निधन

⚡कणकवली ता.०६-: कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी शरद शांताराम पारकर (वय 75) यांचे मंगळवार 6 डिसेंबरला दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. शरद पारकर यांनी काही काळ एसटी महामंडळातही काम केले. त्यांचे इंग्लिश विषयाचे ज्ञान चांगले होते. त्यामुळे ते कणकवलीत मुलांचे क्लासही घ्यायचे. शहरातील महापुरुष मंडळाच्या तसेच इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा हिरहिरीने सहभाग असायचा. शहरातील अंत्यविधी…

Read More

धुरीवाडा साई मंदिर ३२ व्या वर्धापन दिनाला उत्स्फूर्त सहभाग

मालवण दि (प्रतिनिधी) मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिराचा ३२ वा वर्धापन दिन महोत्सव साजरा होत असून काल सायंकाळी मालवण शहरातून साई पादुका व प्रतिमा पालखी मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यावेळी सादर झालेले म्हापण येथील चपई नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. या उत्सवात उद्या दि. ७ डिसेंबर रोजी…

Read More

प्रज्वल स्पोर्ट संघ ठरला भालचंद्र चषकाचा मानकरी

स्वयंभू स्पोर्टसने कोरले उपविजेते पदावर नाव ⚡कणकवली ता.०६-: कणकवली येथील भालचंद्र चषक क्रिकेट स्पर्धेत प्रज्वल स्पोर्ट संघ विजेता ठरला तर स्वयंभू स्पोर्ट कणकवली संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अबिद नाईक, अभय राणे, अण्णा कोदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा लीग स्वरूपात खेळवण्यात आली होती. स्पर्धेचे बक्षीस…

Read More

आंबोली सैनिक स्कूलच्या वतीने मॅरेथॉन, सायकलिंग स्पर्धा

सुनील राऊळ;रायझिंग डे निमित्त ११ व १८ डिसेंबर रोजी आयोजन ⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली रायझिंग डे निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आला असून यात मॅरेथॉन स्पर्धा ही ११ डिसेंबर रोजी तर १८ डिसेंबर रोजी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे केले गेले आहे. यासाठी आकर्षिक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती आंबोली सैनिक स्कूलचे व्यवस्थापक सुनील…

Read More
You cannot copy content of this page