प्रज्वल स्पोर्ट संघ ठरला भालचंद्र चषकाचा मानकरी

स्वयंभू स्पोर्टसने कोरले उपविजेते पदावर नाव

⚡कणकवली ता.०६-: कणकवली येथील भालचंद्र चषक क्रिकेट स्पर्धेत प्रज्वल स्पोर्ट संघ विजेता ठरला तर स्वयंभू स्पोर्ट कणकवली संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अबिद नाईक, अभय राणे, अण्णा कोदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा लीग स्वरूपात खेळवण्यात आली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेवक संजय कामतेकर, अण्णा कोदे, राज नलावडे, सिंधुदुर्ग पोलीस रुपेश परब व राकेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथम क्रमांक विजेत्या प्रज्वल स्पोर्ट संघाला रुपये 18,000 व चषक तर उपविजेत्या स्वयंभू स्पोर्ट संघाला रुपये 12,000 व चषक देऊन गौरविण्यात आले. मालिकाविराचा पुरस्कार प्रज्वल स्पोर्टचे चंद्रा जाधव यांना मिळाला तर प्रज्वल स्पोर्ट्सचे अक्षय जाधव यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वयंभू स्पोर्टच्या गुरु राणे यांना सर्वोत्कृष्ट फलंदाज, प्रज्वल स्पोर्टच्या अभिषेक चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक, शिवारा बॉईजच्या ओमकार वाळवे यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर स्वयंभू स्पोर्टच्या गुरु राणे यांना षटकार किंग पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवलिंग पाटील, अभिषेक चव्हाण, ओंकार खांडेकर, महेश भिसे यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page