धुरीवाडा साई मंदिर ३२ व्या वर्धापन दिनाला उत्स्फूर्त सहभाग

मालवण दि (प्रतिनिधी)

मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिराचा ३२ वा वर्धापन दिन महोत्सव साजरा होत असून काल सायंकाळी मालवण शहरातून साई पादुका व प्रतिमा पालखी मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. यावेळी सादर झालेले म्हापण येथील चपई नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. या उत्सवात उद्या दि. ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम होणार आहेत.

धुरीवाडा येथील साई मंदिराच्या वर्धापन दिन उत्सवास दि २८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. २८रोजी साई सगुण पूजा व साई सतुचरित्र पारायण प्रारंभ झाला. ४ डिसेंबर रोजी पारंपरिक डबलबारी भजन सामना वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके आणि गावदेवी भजन मंडळ, डोंबिवलीचे बुवा संजय पवार यांच्यात रंगला. काल ५ रोजी प्रातः पूजा, साई दुग्धाभिषेक होऊन सायंकाळी साई पादुका पालखी मिरवणूक संपन्न झाली. उद्या ७ रोजी दत्त जयंती उत्सव होणार असून यानिमित्त दुग्धाभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद भंडारा होणार आहे. तर सायंकाळी साईंची महाआरती व रात्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापणचे नवीन नाट्यपुष्प ‘मोरया गोसावी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page